स्त्री शक्तीचे गुज सांगते सखये तुझ्या कानात
शक्ती बुद्धी भक्ती अंतरी हीच मूर्ती मनामनात
पराक्रमाची ढाल तू उबदार मायेची शाल तू
दयेचा सागर तू अवकाशीची पोकळी तू
समाधानाचे शिखर तू शांतीची उत्पत्ती तू
परोपकाराची देवता तू अन्यायाची शत्रू तू
आनंदाची भरती तू स्वर्ग सुखाची लहर तू
विविध गुणांनी नटलेली निसर्गाची देण तू
साकारलेली अशीच प्रतिमा ठसली माझ्या मनी
त्रिवार वंदन तुला अर्पिते मातृ शक्तीच्या मंगलदिनी
गाऊ दे अशीच महती अखंड जाऊ दे बुडुनी
सन्मानाचा हिरा कोंडोनी ठेवते माझ्या हृदय कोंदणी
सौ चित्रा चौधरी
सिद्धिविनायक नगर
वि.म.वि. अमरावती 4
मो.9890967003