Hurry Up Now The Deal is Here!

गाणी गाडगेबाबांची आणि संत गाडगेबाबा संपूर्ण महाराष्ट्रात :

शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी घेतला पुढाकार

अमरावती दि.1- शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांचे श्री संत गाडगेबाबा यांच्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन श्री संत गाडगेबाबा कीर्तनासाठी जी गाडी वापरत होते ती गाडी ट्रेलरवर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात फिरवली आणि श्री संत गाडगेबाबा यांचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा प्रयत्न केला .

आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाला ते अमरावतीला आले असताना मिशन आय .ए. एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांची भेट घेतली. श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर संत गाडगेबाबा हे नाटक तयार झाले असून गाणी गाडगेबाबाची हा कार्यक्रम देखील तयार झालेला आहे. या कार्यक्रमाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात व्हावे यासाठी प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली असून श्री संत गाडगे महाराजांचा विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने या नाटकाचे प्रयोग व गाणी गाडगेबाबाची हे दोन उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यास तत्वतः मान्यता दिली. श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरील नाटक श्री विराज जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत होत असून गाणी गाडगेबाबाची हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक व संगीतकार गझलरत्न प्रा. डॉ. राजेश उमाळे यांनी तयार केला असून या कार्यक्रमाचे सादरीकरण ते त्यांच्या सहकारी गायक व गायिका यांना घेऊन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक श्री नितीन भट हे करणार आहेत. यापूर्वी देखील मिशन आय ए एस ने प्रा. एम टी देशमुख यांची भूमिका असलेले क्रांतीयोगी गाडगेबाबा या नाटकाचे प्रयोग ठीक ठिकाणी आयोजित केले होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या जीवनावर श्री संत गाडगेबाबा यांचा जबरदस्त पगडा असून त्याचे विचार जनमांनसामध्ये पोहोचावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. श्री संत गाडगेबाबा यांचे चालक व प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना त्यांनी मुंबईला बोलवून त्यांच्या निवासस्थानी सत्कार घडवून आणला व त्यांची मा. मुख्यमंत्र्यांबरोबर भेट करून दिली. माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री गाडगेबाबा यांचे चालक श्री भाऊराव काळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री संत गाडगेबाबा हे जे वाहन कीर्तनासाठी वापरत होते ते आता जीर्ण झाली असून फिरण्याच्या परिस्थितीत नाही. पण माननीय श्री दादाजी भुसे यांनी ते वाहन ट्रेलरवर चढवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवले व गाडगेबाबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला:
शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी श्री संत गाडगेबाबा यांच्या बाबतीत जो सकारात्मक निर्णय घेतला त्याबद्दल मिशनचे अध्यक्ष श्री डी.व्ही .मोडक स्वागत अध्यक्ष श्री गजानन पुंडकर संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे कार्याध्यक्ष श्री नरेंद्र बोरकर सदस्य श्री रवींद्र दांडगे श्री नंदकिशोर खडसे श्री माधव रेखे सदस्य प्राचार्य रामदास चवरे प्रा.शरद पुसदकर गौतम मोहोड व श्री राजेंद्र इंगोले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या लोकाभिमुख उपक्रमामध्ये साहित्यिक चळवळीमध्ये आवड असणाऱ्या मान्यवरांनी सहभागी व्हावे असे आवाहन मिशन आयएएसने केले आहे.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *