दिनांक 27 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात एक आगळावेगळा कार्यक्रम होत आहे .त्या कार्यक्रमाचे नामांकन स्पर्धा परीक्षा कार्यशाळा असे केले तरी चालेल. अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे भरपूर विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना सातत्याने स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी अमरावती जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष व क्रियाशील व उपक्रमशील मुख्य कार्यकारी श्रीमती संजीता मोहापात्रा यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. संजीता मॅडम ह्या उपक्रमशील आयएएस अधिकारी आहेत . याच आठवड्यात त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक दिवसाची सुसंवाद कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये अधिकाऱ्यांच्या अडचणी समस्या समजावून घेणे व त्यातून समाजाभिमुख मार्ग काढणे हा त्यांचा हेतू होता.. शुक्रवार दिनांक त्यांनी सुप्रसिद् आय ए एस अधिकारी श्री अमर राऊत यांना निमंत्रित केले आहे. श्री अमर राऊत हे गतिवर्षीचे आयएएस अधिकारी आहेत सध्या अमरावतीला प्रोबेशनवर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते अलीकडेच परीक्षा उत्तीर्ण झाले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मार्गदर्शन करू शकतील असा विश्वास आहे . अमरावतीला श्री किरण गीते हे आयएएस अधिकारी असताना आम्ही वर्षभर दर शुक्रवारी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित केला होता.. अशा प्रकारचे उपक्रम सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री श्रीकर परदेशी यांनी नांदेडला श्री जी श्रीकांत यांनी अकोला येथे तर श्री दीपक म्हैसेकर यांनी चंद्रपूर येथे याआधी सुरू केलेला आहे.. केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा कशी कठीणच. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे निष्ठेने सातत्याने अभ्यास करतात आणि दृष्टी ठेवून अभ्यास करतात ते मुले या परीक्षेमध्ये हमखास यशस्वी होतात. या कठीण परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून दहावा क्रमांक मिळवणे म्हणजे तारेवरची कसरतच .पण ती तारेवरची कसरत ओरिसा राज्यातील संगीता मोहापात्रा यांनी यशस्वी करून दाखविली .विपरीत परिस्थिती असताना त्यांनी आयएएस या परीक्षेमध्ये अखिल भारतीय स्तरावर दहावा क्रमांक प्राप्त करून ओरिसा प्रांताच्या सन्मानामध्ये मानाचा मुकुट रुजविला आहे .खरं म्हणजे ओरिसा हे राज्य महाराष्ट्रासारखे प्रगतशील नाही. मागासलेले राज्य अशी त्याची ओळख आहे. त्या ओडिसा राज्यात राहून संगीताताईंनी जे यश प्राप्त केलेले आहे ते खरोखरच दैदिप्यमान आहे. माझे पुस्तक वाचून आय ए एस झालेले विद्यार्थी व सध्या धुळे येथे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले श्री विशाल नरवाडे हे आणि संगीता मोहापात्रा हे एका बॅचचे आयएएस अधिकारी . संजिता मोहापात्रा यांची माझी भेट अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात झाली. त्याचे असे झाले की महाराष्ट्र कॅडर भेटलेल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जायचे त्या जिल्ह्याची तोंड ओळख करून घ्यायची .असा तो कार्यक्रम होता .विशाल नरवाडे यांनी मला याची पूर्वकल्पना दिली होती. त्याप्रमाणे आम्ही अकोला येथे सर्व आयएएस झालेल्या नवीन अधिकाऱ्यांचा सत्कार केला. हे सर्व अधिकारी नंतर अमरावतीला आले .त्यांची माझी चुकामुक झाली .या सर्वांसाठी तयार केलेले सन्मानपत्र आम्ही त्यांच्या त्यांच्या गावाला जाऊन दिले. मोहापात्रा मॅडमचे सन्मानपत्र मात्र देण्याचा योग अमरावतीला त्या रुजू झाल्यानंतरच आला .मी व मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई त्यांना भेटावयास गेलो. मॅडमनी आमचे चांगले स्वागत केले. चर्चे दरम्यान त्या म्हणाल्या सर मी पहिल्या वर्गापासून आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आज ते पूर्ण झालेले आहे .मला वाटते इतरही मुलांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मी ठरवले आहे की माझ्या या कक्षामध्ये ज्या मुलांना आयएएस व्हायचे आहे त्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मी आयएएसचे धडे देणार आहे. मला आश्चर्यच वाटले .खरं म्हणजे मॅडम नुकत्याच प्रसूती रजेवरून आल्या होत्या. लहान बाळ आहे .त्या बाळाबरोबरच आपल्या अमरावती शहरातील विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या संगीता मॅडम मला खऱ्या अर्थाने दिव्यदृष्टी असलेल्या जाणवल्या. मी त्यांना म्हटले मॅडम आम्ही मिशन आयएएस पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आहोत .आपण एखाद्या कार्यक्रमाला येणार का ? त्यांनी पटकन होकार दिला. आणि त्याप्रमाणे त्या मिशन आयएएसने पोद्दार इंटरनॅशनल शाळेमध्ये आयोजित केलेल्या भव्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आल्या. कार्यक्रम खूपच रंगला. संगीता मॅडमनी आपली पूर्ण पार्श्वभूमी मुलांसमोर सांगितले. सामान्य शाळेमध्ये शिक्षण. वडीलाची जेमतेम नोकरी. पण संगीता मॅडमनी पहिल्या वर्गात ठरवले होते की मला आयएएस व्हायचे आहे आणि त्या केवळ ध्येय ठरवून थांबल्या नाहीत तर त्यांनी संपूर्ण भारतातून दहावा क्रमांक प्राप्त करून मी या ध्येयप्राप्तीसाठी किती कष्ट झेलले हे सिद्ध करून दाखवले. त्यांची पदवी झाल्याबरोबर त्यांना उच्च पगाराची खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली .काही वेळ काही काळ त्या नोकरीत घालवल्यानंतर त्यांना जाणवले की मी समाजासाठी काहीच करू शकत नाही .मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे. माझे आयुष्य समाजाच्या उपयोगात आले पाहिजे..त्यासाठी त्यांनी आपली नोकरी बाजूला ठेवली आणि आय ए एस ची तयारी केली आणि त्यामध्ये यश संपादन करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. माझ्या संगीता मॅडम बरोबर ज्या काही भेटी झाल्या. चर्चा झाल्या. त्यावरून त्यांच्या ठिकाणी असलेली तत्परता तेजस्विता व तपस्विता माझ्या लक्षात आली. समाजाप्रती त्यांना तळमळ आहे .त्यासाठी स्वतःच्या लहान बाळाला घरी ठेवून मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या पोदा र इंटरनॅशनल शाळे मध्ये आल्या. आम्ही मॅडमच्या सूचनेनुसार भेटण्याची वेळ नऊ पंचेचाळीस ची वेळ ठरवली होती. मी ठरल्याप्रमाणे त्यावेळेला अमरावतीला कांता नगर मधील त्यांच्या सरकारी बंगल्यावर पोहोचलो .मॅडम तयार होत्या .लगेच आमच्या गाड्या कठोरा रोडवरील पोदार इंटरनॅशनल शाळेकडे धावायला लागल्या. मॅडमनी विद्यार्थ्यांना जवळपास तासभर मार्गदर्शन केले. मॅडम विद्यार्थ्यांमध्ये इतक्या रमल्या की प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 20 – 25 झाली. मी व प्राचार्य सुधीर महाजन यांनी ठरवले की काही निवडक मुलांना प्रश्न विचारू द्यायचे .कारण की लहान बाळ घरी आहे .सुट्टीचा दिवस आहे. मॅडमला लवकर घरी जायला मिळाले तर बरे होईल .हा विचार आमच्या मनात आला. म्हणून चार-पाच मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर आम्ही जसे मुलांना थांबविण्याचा प्रयत्न केला तसे मॅडम म्हणाल्या .सर त्यांना विचारू द्या . मला वेळ आहे. मला त्यांचे समाधान करू द्या. मला नवलच वाटले आणि मॅडम मुलांसमोर दिलखुलासपणे प्रश्नांची उत्तरे देऊ लागल्या .पूर्ण विद्यार्थ्यांनी मन लावून कार्यक्रम ऐकला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या इतिहासामध्ये एका चांगल्या कार्यक्रमाची नोंद झाली. तुम्ही मॅडमकडे गेले तर मॅडमच्या टेबलवर तुम्हाला पेंडिंग फाईल दिसणार नाही .कोणतेही काम ताबडतोब करण्याची त्यांची प्रवृत्ती माझ्या लक्षात आली. आय.ए एस च्या परीक्षेमध्ये दहावा क्रमांक प्राप्त संगीता मॅडम काम करण्यातही तेवढ्यात तरबेज आहेत . कोणतेही काम ताबडतोब करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
मला आयएएस विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे एवढे म्हणून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी येत्या 28 तारखेला स्वतः पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केली आहे. मी त्यांच्यासमोर त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध विद्यालयांमध्ये मिशन आहय ए एस तर्फे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा प्रस्ताव ठेवला. मॅडमनी तो ताबडतोब मंजूर केला. आणि मला म्हणाल्या मी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगते. आपण जिल्हा परिषदेमधील निवडक मोठ्या शाळांमध्ये तुमचे कार्यक्रम आयोजित करू या हा निर्णय घ्यायला त्यांना फक्त एक मिनिट लागला. पाहू ..नंतर या ….मी शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलतोय …..हा प्रकार मला आढळून आला नाही .म्हणून त्यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल जीतने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंगसे करते है .एक कर्तव्यदक्ष तत्पर तेजस्वी आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या संजिता मोहापात्रा अमरावती जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्या हे खरोखरच अमरावती जिल्ह्यासाठी एक परवणी आहे.. या संधीचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे. अनेक अधिकारी येतात .चांगले उपक्रम राबवतात .उपरोक्त उपक्रम उर्वरित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी खऱ्या अर्थाने साथ दिली तर अमरावती जिल्हा परिषद ही महाराष्ट्रामध्ये चर्चेत आल्याशिवाय राहणार नाही .त्यासाठी साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना. खर म्हणजे स्पर्धा परीक्षा आयोजित करणे हे आमच्या अमरावतीकरांचे काम आहे .पण ओरीसा मधली एक सुस्वभावी सामाजिक बांधिलकीची अधिकारी अमरावतीला येते .अमरावतीला जागे करते. या घटनेपासून अमरावतीकर घटकांनी बोध घ्यावा. असे या महसूल पंधरवडा निमित्त अमरावती जिल्ह्यातील सुजाण नागरिकांना सांगावेसे वाटते. रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर त्या कवितेमध्ये म्हणतात मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला माझं काम माझ्या नंतर कोण करेल. कोणीच उत्तर दिलं नाही. एक मिणमिणती पणती म्हणाली भगवान मी माझ्या परीने प्रयत्न करेन .असा प्रामाणिक प्रयत्न संगीता मॅडम करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामध्ये आम्ही त्यांना हातभार लावणारच आहोत .आपणही आपला खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा आहे . एक चांगला उपक्रम संजिता मॅडम अमरावती जिल्हा परिषद मध्ये दिनांक 27 पासून प्रारंभ करीत आहेत त्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!!
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे (9890967003)
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी,अमरावती कॅम्प.