महात्मा फुले यांना काव्यात्मक अभिवादन
काळ पारतंत्र्याचा काळा
भरवली अस्पृश्यांची शाळा
विषमतेचा विळखा मोडून
ज्ञानज्योतीने तेजाळला फळा
जिच्या हाती पाळण्याची दोरी
तिने शिकाव्या चार ओळी
मातृसंस्कार विचार धारणेतून
भावी पिढीस अक्षरांची गोडी
फुलविला साहित्याचा मळा
लिहून शिवाजीराजे पोवाडा
तृतीय रत्न, गुलामगिरी ग्रंथ
इशाऱ्यात अंधश्रद्धेला आळा
सत्यशोधक समाज स्थापन
पारंपारिक पुरोहित खंडन
स्त्री पुरुष समानता साधली
पत्कारून विरोध सनातन
सन्मान महाराष्ट्र पोशिंद्याला
मांडले शेतकरी व्यथेला
सावकारांचे वर्चस्व मोडून
शोधले दुष्काळी पर्यायाला.
समाजसेवक महात्मा फुले
जनहितार्थ शिक्षणद्वार खुले
अन्यायाविरुद्ध घडवून क्रांती
इतिहासी अजरामर जाहले.
शैलजा लोखंडे गोरडे
लक्ष्मी नगर रींग रोड वरूड
7038251196