संपूर्ण यवतमाळकरांना अभिमान वाटावा अशी एक महत्त्वपूर्ण घटना यवतमाळ शहरात घडलेली आहे. यावर्षीच्या निकालामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन विद्यार्थी आयएएस ही परीक्षा पास झालेले आहे त्यापैकी दोन विद्यार्थी हे यवतमाळचे असून त्यामध्ये मुस्लिम समाजातील आयएएस झालेली विद्यार्थिनी कुमारी अदीवाअनम अश्फाक अहमद हिने केवळ यवतमाळ महाराष्ट्र किंवा भारत नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मुस्लिम बांधवांमध्ये आय ए एस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन विजयाच्या झेंडा फडकवला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सुपुत्र श्री जयकुमार आडे यांनी देखील ही परीक्षा उत्तीर्ण करून यवतमाळ नगरीत आनंदाचे वातावरण तयार केले आहे
या दोन्हीही आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन मिशन आयएएस व यवतमाळच्या सत्यशोधक समाजातर्फे संपन्न करण्यात आला. डॉक्टर जयकुमार आडे यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणारे श्री विलास काळे सौ सुनीता काळे डॉक्टर दिलीप धावडे चिरंजीव धावडे कुमारी धावडे मिशन आय चे संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे माधव रेखे व दीपक काठोळे हे उपस्थित होते. डॉक्टर जयकुमार आडे यांनी याप्रसंगी आपली यशोगाथा उपस्थितांना सांगितले तसेच समाजातील तलागाळासाठी काम करण्याची आपली मनोवृत्ती असल्याचे प्रतिपादन केले
संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी मुस्लिम समाजातून सर्वप्रथम आयएएस होणारी अदिबा अनम अश्फाक अहमद ही संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे ठिकठिकाणी सत्कार होत असून तिच्या दहा मे पर्यंतच्या सगळ्या तारखा बुक झालेल्या आहेत. . आम्ही त्याच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्याने दिलेल्या बुकेचा ढीग पडला आहे. काल पुण्याच्या युनिकअकादमीचा भव्य कार्यक्रमातून ती यवतमाळला आल्यानंतर मिशन आय ए एस चे संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे माधव रेखे दीपक काठोळेयांनी सन्मानपत्र देऊन तिच्या गौरव केला व तिला अमरावतीला होणाऱ्या भव्य सत्कार समारंभाचे निमंत्रण दिले. दहा महिन्यानंतर ती अमरावतीला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरातील सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी सत्यशोधक समाज यवतमाळ तर्फे देखील तिचा व तिच्या वडिलांचा गौरव श्री विलास व सुनिता काळे व त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे करण्यात आला आहे विशेष म्हणजे अदीबाचे वडील यांना श्री विलास काळे यांच्या वडिलांनी शिकविले आहे. याप्रसंगी सत्यशोधक समाज यवतमाळच्या महिला प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते.. यवतमाळ सारख्या शहरातून यावर्षी तीन विद्यार्थी आयएएस झालेले आहेत ही यवतमाळ भाषांसाठी गौरवाची बातमी आहे या मुलांच्या अनुकरण करून यवतमाळातील इतरही विद्यार्थ्यांनी सनदी परीक्षेची तयारी आतापासून सुरू करावी असा मनोदय याप्रसंगी मिशन आय ए एस चे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी व्यक्त केला आहे. या आय ए एस झालेल्या विद्यार्थ्यांमुळे यवतमाळ शहरात व यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003