Hurry Up Now The Deal is Here!

अमरावती दि. 8. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या मातोश्री तसेच दिवंगत लोक नेते राज्यपाल श्री रा. सू. गवई त्यांच्या अर्धांगिनी प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार येत्या जागतिक महिला दिनानिमित्त दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमती कमलताई गवई यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय विपश्यना वृक्षारोपण या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचा हा सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे. श्रीमती कमलताई गवई यांनी त्यांचे यजमान आमदार खासदार व नंतर राज्यपाल राहिलेले श्री रा सू गवई यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले याशिवाय त्यांच्या निधनानंतर देखील त्यांनी निरंतर सामाजिक शैक्षणिक राजकीय विपश्यना व वृक्षारोपण या क्षेत्रात कार्य सुरूच ठेवले. च्या कार्याची दखल घेऊन हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई सारख्या तपस्वी व्यक्तिमत्वाला हा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून दूरध्वनी द्वारे त्यांचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे .

दि.,6 मार्च रोजी परभणीला जवाहर नवोदय विद्यालय परिसरात परभणीचे जिल्हाधिकारी व परभणीच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष श्री रघुनाथ गावडे यांनी कमलताईं गवई यांचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्द जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन गौरव केला. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक महिला दिनानिमित्त टाकलेल्या मंडपात हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग तसेच मिशन आहे चे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे उपस्थित होते .

काल दिनांक सहा मार्च रोजी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.श्रीमती कमलताई गवई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी हे उपस्थित होते. त्यांना जेव्हा जीवन गौरव पुरस्कार कमलताईंना प्राप्त झाल्याची बातमी कळली तेव्हा त्यांनी व कुलसचिव तसेच कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी कमलताई गवई यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला .याप्रसंगी विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .या प्रसंगी मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई यांचा सविस्तर परिचय करून दिला. याप्रसंगी डॉ. बी व्ही आसेवार संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. के एस बॅग संचालक संशोधन डॉ.आर डी अहिरे संचालक शिक्षण विस्तार कुलसचिव व उपजिल्हाधिकारी श्री संतोष वेणीकर त्याचप्रमाणे सामुदायिक महाविद्यालयाच्या प्राचार्य व अधिष्ठाता डॉक्टर जया बंगाळे व डॉ.गोदावरी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सहाय्यक संशोधक श्रीमती सारिका हरिश्चंद्र नारळे यांनी कमलताईच्या जीवनावर व महिला दिनानिमित्त दोन कविता सादर केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर गजेंद्र लोंढे प्राध्यापक डॉक्टर फारिया खान प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर पडघान यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका फरिया खान यांनी केले. यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू यांनी श्रीमती कमलताई गवई यांच्या यांच्या आपल्या निवासस्थानी शाल श्रीफळ बुके व पुस्तक देऊन कौटुंबिक सत्कार देखील केला.
मा.लेडी गव्हर्नर व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलताई गवई यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून त्यांच्यावर प्रेम करणारी काही मंडळी जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना झाली आहे. पुढील महिन्यात 14 मे रोजी अमरावतीचे सुपुत्र व सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेले श्री भूषण गवळी हे सरन्यायाधीशाची शपथ दिलेला घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *