Hurry Up Now The Deal is Here!

२५ मार्च हा संभाजी नगरचे जिल्हाधिकारी श्रीरोजी छत्रपती संभाजी नगरचे नवीन जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचा वाढदिवस . यावर्षीचा वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे कारण त्यांना लागोपाठ तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यापैकी दोन पुरस्कार हे शासनाचे असून तिसरा पुरस्कार दैनिक लोकसत्तेने दिलेला निवडणूक कामात त कर्तव्यदक्ष राहून केलेल्या तत्पर कारवाई बद्दल श्री दिलीप स्वामी यांना महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे त्यानंतर बालकांसाठी घेतलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल परत महाराष्ट्र शासनाने त्यांना गौरविले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये मोलाचे स्थान बजावणाऱ्या दैनिक लोकसत्ताने त्यांना पहिल्या क्रमांकाचे जिल्हाधिकारी म्हणून प्रथम क्रमांकाने त्यांचा नुकताच जाहीर सत्कार घेतला आहे.. संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्व ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. मागच्या वर्षी मा.श्री दिलीप स्वामी यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित पवार यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव केला आणि त्यांनी सुरू केलेला पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील यंत्रणेने राबवावा अशा सूचना त्यांनी लगेच केल्या .एक प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलीप स्वामी साहेब आहेत. ते जेथे जातात तेथे आपले विश्व निर्माण करतात. मला आठवते त्यांच्या प्रशासकीय जीवनाची सुरुवात अमरावतीपासून झाली .अमरावती शहरांमध्ये त्यांनी अनेक चांगली कामे केलीत ,त्यामुळे आजही ते अमरावतीकरांच्या लक्षात आहेत .साहेब आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजे पूर्वीचे औरंगाबादला जिल्हाधिकारी आहेत . खरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे दुर्लक्षित शाळा. परंतु या शाळांना सुसज्ज स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प श्री दिलीप स्वामी यांनी सोलापूरला असताना बांधला . त्यांनी संकल्प सोडला. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांना विश्वासात घेतले. आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले. जितनेवाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंगसे करते है .या नात्यानं ते कामाला लागले. शासकीय निधी आणि लोकवर्गणी आणि लोकसहभाग यातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला स्वच्छ व सुंदर व क्रियाशील शाळेमध्ये परिवर्तीत केले .प्रशासकीय अधिकाऱ्याने पुढाकार घेतला म्हणजे काय बदल होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलीप स्वामीसाहेब आहेत. त्यांच्या कार्यकाळाची तसेच त्यांच्या कार्याची महती उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यापर्यंत गेली. मा. उपमुख्यमंत्री यांनी पूर्ण प्रकल्प समजावून घेतला आणि त्यांना तो इतका आवडला की त्यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमांमधून दिलीप स्वामी यांचा सोलापूर पॅटर्न सगळ्या शाळांनी सगळ्या जिल्हा परिषदांनी राबवावा अशा आपल्या भाषणामध्ये आवर्जून उल्लेख केला. खरे म्हणजे स्वामीसाहेब हे करू शकले ते त्यांच्या स्वभावामुळे. कारण विनम्रता विनयशीलता कृतिशीलता या गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये झालेला आहे. आणि म्हणून ते जिथे जातात तिथे आपली एक छाप पाडून जातात . यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे उपविभागीय अधिकारी होते. यवतमाळ जिल्हा म्हणजे शेतकऱ्यांनी सर्वात जास्त आत्महत्या केलेला जिल्हा. पण पुसदला ते उप विभागीय अधिकारी असताना त्यांनी शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून तेव्हा देखील महाराष्ट्र शासनाची शाबासकी मिळवली होती. खरं म्हणजे लोकसहभागातून जिल्हा परिषदेची शाळा उभी करणे. ती स्वच्छ व सुंदर बनवणे. लोकाभिमुख बनविणे तसे कठीणच काम. पण लोकांना जर तुम्ही विश्वासात घेतले तर लोक काय करू शकतात याचे उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेतील शाळा .असा उल्लेख आपल्याला करावा लागेल. विशेष म्हणजे हे काम त्यांनी कोरोना काळात केलेले आहे. माझे गाव पूर्ण कोरोनामुक्त गाव. या बरोबरच त्यांनी स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम कोरोना काळात राहून तसेच लोकवर्गणीतून लाखो रुपयांचा निधी जमा करून त्या निधीचा विनियोग शाळेतील साहित्यासाठी शाळेत उपक्रमासाठी राबवून त्यांनी एक आमूलाग्र बदल घडवून आणलेला आहे .आणि या उपक्रमामध्ये त्यांनी सातत्य ठेवले .उपक्रमांमध्ये खंड पडू दिला नाही. मध्यंतरी दिलीप स्वामी साहेब कोरोनाग्रस्त झाले .परंतु कोरोना ग्रस्त असताना व १४ दिवस विलगीकरणात असतानाही ते थांबले नाहीत .त्यांनी कोरोना काळातही आपले काम सुरूच ठेवले .दिलीप स्वामी साहेबांनी पारावरची शाळा. पर्यावरण संतुलनासाठी माझी वसुंधरा उपक्रम. माझे मुल माझे अभियान .माझे गाव कोरोनामुक्त .हे सगळे उपक्रम लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी राबविले. ऑफ द पीपल फॉर द पिपल बाय द पिपल हे अब्राहम लिंकनचे वाक्य त्यांनी प्रत्यक्ष अमलात आणले. खरे म्हणजे आज-काल प्रशासकीय अधिकारी .जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व स्थानिक लोक एकत्र आले तर काय करू शकतात हे सोलापूर जिल्हा परिषदेने दाखवून दिले आहे .अनेक वेळा या तिन्हीमध्ये सुसंवाद नसतो. त्यामुळे गावाच्या विकासाचा मार्गात कुठे राजकारण आडवे येते ! तर कुठं काय ? दिलीप स्वामी साहेबांनी यावर मार्ग काढला. आणि प्रशासन राजकारण आणि समाजकारण या तिन्हीचा संगम त्यांनी घडवून आणला. आणि त्याला इतका प्रतिसाद मिळाला की या चांगल्या कामासाठी प्रशासकीय निधी तर मिळालाच .पण सर्वात महत्त्वाचं लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छ शाळा सुंदर शाळा कोरोना मुक्त गाव यासाठी सढळ हाताने आपला हात समोर केला .सढळ हाताने मदत केली. साथी हात बढाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना या न्यायाने स्वामीसाहेबांनी एक हात पुढे केला. स्वतःचा अहंकार (जो त्यांना नव्हताच )मी मोठा वरिष्ठ अधिकारी आहे. हा बुरखा त्यांनी केव्हाच काढून टाकलेला आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी तो नव्हताच. त्यामुळे लोक भराभर मदतीला आले. लोकांना जिल्हा परिषदेची शाळा लाभी लागली.आज सोलापूर जिल्हा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी पाठराखण केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे .दिलीप स्वामीसाहेबांनी जे त्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे प्रयोग केलेले आहेत ते पाहायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत .कारण हा आता दिलीप स्वामी यांचा सोलापूर पँटर्न प्रत्येक जिल्हा परिषदेने राबवावा असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी केले आहे .एक प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो. लोकसहभागातून किती बदल घडवून आणू शकतो .लोकप्रतिनिधींना अनुकूल कसा करू शकतो .याचा आदर्श म्हणून मी मा. श्री दिलीप स्वामीसाहेबांकडे पाहतो .त्यांनी असेच उपक्रम सातत्याने राबवित लोकाभिमुख कार्य करावे असे या प्रसंगी शुभेच्छा दाखल दोन शब्द व्यक्त करतो. प्रशासनात जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून येत आहेत व येणार आहेत त्यांनी आवर्जून छत्रपती संभाजी नगरला जाऊन दिलीप स्वामी साहेबांची भेट घ्यावी . त्यांच्याकडून सोलापूर पॅटर्न समजावून घ्यावा. आणि आपल्या भावी आयुष्यामध्ये अधिकारी झाल्यावर त्याचा अवलंब करावा .असे या प्रसंगी सांगावेसे वाटते. त्यांनी एका वर्षात केलेल्या पूर्व कामगिरीबद्दल शासनाने त्यांना दोन वेळा राज्य पुरस्कार देऊन त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार घडवून आणलेला आहे तसेच प्रसार माध्यमांमध्ये महिलांच्या दगड असलेल्या दैनिक लोकसत्ताने देखील त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणारा सर्वोच्च बहुमान देऊन नुकतेच गौरविलेले आहे आणि दिलीप स्वामी साहेबांसारखे प्रशासकीय अधिकारी गावागावात शहराशहरात जिल्ह्याजिल्ह्यात खऱ्या अर्थाने काम करायला लागले तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही . महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना छत्रपती संभाजी नगराच्या जिल्हाधिकारी पदी नेमले आहे. दिलीप स्वामी साहेब चांगले काम करीत होते,करीत आहे व आता तर उत्कृष्ट जिल्हाधिकारी झाल्यामुळे त्यांच्या कामाला अजून वेग येणार आहे .चला या कामात आपला खारीचा वाटा उचलू या .आणि तुझे गावच नाही का तीर्थ ! कशाला पंढरी जातो ? हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संदेश खऱ्या अर्थाने अमलात आणू या.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *