Hurry Up Now The Deal is Here!

यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र – नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा काम केले होते.

देवराष्ट्रे (सातारा जिल्हा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण कराड येथे घेऊन उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए., एल्‌एल्‌. बी. झाले. १९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा तीत भाग घेतला. १९३२ साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला.

१९४६ साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. १९४८ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली व १९५२ च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले. पुढे १९६२–६६ या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, १९६६–७० गृहमंत्री, १९७०–७४ पर्यंत अर्थमंत्री आणि १९७४ पासून परराष्ट्रमंत्री बनले.

१९६९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा ती सावरण्याच्या कामी यशवंतरावांनी आटोकाट प्रयत्न केले. देशात यादवीचे वातावरण न ठेवता समन्वयाचे असावे; कारण भारतासारख्या प्रचंड, भिन्न भिन्न जातिधर्मांच्या देशात त्याखेरीज आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होणार नाही, ही यशवंतरावांची धारणा आहे. पुरोगामी विचारांचा ते पाठपुरावा करतात. ते पोथीनिष्ठ नाहीत. नीतिमूल्यांचा पुरस्कार व्यवहारात व्हावा, अशी त्यांची इच्छा व प्रयत्न असतात. झगमगाटापेक्षा संथपणा, सातत्य हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि तेच त्यांचे शक्तिस्थान आहे.

मागील वर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती तर्फे यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी सतत 10 दिवस अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न केली. एवढा मोठा कार्यक्रम सलग दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही झालेला नाही. या वर्षी सुद्धा मिशन आयएएस अकादमी अमरावती तर्फे सतत कार्यक्रम राबविले जात आहेत ज्या मध्ये स्पर्धा परिक्षेतील नवनविन विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शालेय स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात या मध्ये मिशन आयएएस अकादमी अमरावती यांचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे सतत आपले मोलाचे कार्य करित आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *