Hurry Up Now The Deal is Here!

दिनांक 21 एप्रिल 2025 राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त काही आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांचा हा परिचय

आज 21 एप्रिल नागरी सेवा दिन संपूर्ण भारतात सन्मानाने साजरा करण्यात येतो. सनदी अधिकारी झालेले सर्व अधिकारी त्यांच्या त्यांच्या भागात हा नागरी सेवा दिन साजरा करीत असतात. आज अमरावती शहरामध्ये जे सनदी अधिकारी कार्यरत आहेत त्यामध्ये सर्वोच्च पदावर असणाऱ्या अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांचा माझा परिचय अकोला येथे प्रमिलाताई ओक हॉलमध्ये झाला. तेव्हा त्या प्रोबेशनवर आयएएस अधिकारी म्हणून झाल्या होत्या. सध्या मुख्यमंत्र्याचे सचिव असलेले मा. श्री श्रीकर परदेशी यांनी दर महिन्याच्या पाच तारखेला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन महाराष्ट्र राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचे पालन काही सनदी अधिकारी करीत आहेत .त्यापैकी एक होते ते श्री जी.श्रीकांत .ते जेव्हा अकोला येथे जिल्हाधिकारी होते. दर महिन्याच्या पाच तारखेला अकोला येथे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायची .तेथील संयोजक श्री प्रकाश अंधारे माझी या कामी मार्गदर्शन घेत होते. एक सनदी अधिकारी व एक प्रेरणादायी वक्ता असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. श्रीमती श्वेता मॅडम या कार्यक्रमाला आल्या. त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि आज त्या अमरावतीच्या सर्वोच्च पदावर म्हणजे विभागीय आयुक्त या पदावर कार्यरत आहेत .

अमरावती विभागाचे विभागीय पोलीस उप महानिरीक्षक पदी आज श्री रामनाथ पोकळे कार्यरत आहेत .ते बीड जिल्ह्यातील सुपुत्र .ते जेव्हा अमरावतीला रुजू होणार होते तेव्हा बीड जिल्ह्यातून मला बरेच फोन आले आणि आमचे साहेब तुमच्या जिल्ह्यात डीआयजी म्हणून येणार आहेत असे संकेत त्यांनी दिले .साहेब अमरावती येथे डी आय जी म्हणून रुजू झाल्याबरोबर मी त्यांना भेटायला गेलो
त्यांनी माझे हसून स्वागत केले व बसायला खुर्ची दिली. मी ते अमरावती विभागात रुजू झाल्याबद्दल त्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. श्री पोकळेसाहेबांना सकाळी फिरण्याची सवय आहे आणि त्यासाठी हे नियमितपणे श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात फिरावयास येतात. एक चांगले अधिकारी आमच्या पाच जिल्ह्याला लाभले याचा आम्हाला अभिमान आहे
अमरावतीच्या जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांच्या माझा पहिला परिचय संभाजीनगर येथे झाला. मी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडे बसलो होतो .श्री पुरुषोत्तम भापकर हे तेव्हा विभागीय आयुक्त होते. श्री भापकर साहेबांनी माझ्याबरोबर असलेले प्रेरणादायी वक्ते श्री शिवाजी कुचे यांचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले होते. त्या ठिकाणी श्री सौरभ कटियार यांचा माझा परिचय झाला. ते ज्या महाविद्यालयामध्ये शिकले त्या लखनऊच्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे एक दिवसभर सेमिनार घेण्याचा योग मला आला. श्री सौरभ कटियार हे कानपूर जिल्ह्यातील .त्यांच्या नातेवाईकांनी माझे स्पर्धा परीक्षांचे बरेच कार्यक्रम त्या भागात घडवून आणले. अमरावतीला येण्यापूर्वी ते अकोला येथे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. माझा अकोल्याचा विद्यार्थी प्रशांत भाग्यवंत तेव्हा आय ए एस ची तयारी करीत होता. माझे दुसरे सन्मित्र श्री राहुल रेखावार यांनी प्रशांतला सौरभ कटियार यांचे मार्गदर्शन घेण्यात सुचविले होते. त्याप्रमाणे प्रशांत सौरभ सरांना भेटला व त्यांचे मार्गदर्शन घेतले .

अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी हे सर्व अमरावती करांना परिचित आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे सर्वांना भेटणे सर्वांचे प्रश्न सोडवणे हे व्रत त्यांनी स्वीकारले आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांचा प्रसन्न चेहरा पाहून मी पण प्रसन्न झालो. खरं म्हणजे पोलीस खात्यात राहणे म्हणजे ताण-तणावात राहणे असे आहे पण हे समीकरण श्री नवीनचंद्र रेड्डी यांनी बदलवून टाकले आहे. ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. आमच्या मिशन आयएएस मध्ये ही ते बरेचदा आलेले आहेत. आम्ही आमच्या मिशनची सहल घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. एवढी मोठी मुले एकदम पोलिसांच्या आयुक्तालयात पाहून पोलीस प्रशासन जागे झाले. काहीतरी गडबड तर नाही ना असे त्यांना वाटायला लागले. पण मी खुलासा केला आणि सर्वांनी पोलीस आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला. श्री नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व मुलांचे स्वागत केले .त्यांचे आदरतिथ्य केले. त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली आणि त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली .त्यांच्या बाजूला पोलीस उपायुक्त श्रीमती कल्पना बारावकर स्थानापन्न झाल्या होत्या. त्यांचे मार्गदर्शन घेण्यास आम्हाला त्यांनी सुचवले .मुलांनी त्यांच्याबरोबर भरपूर फोटो काढले. एक चांगला पोलिस आयुक्त कसा असू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री नवीनचंद्र रेड्डी
अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांचा माझा परिचय माझे राजकीय मित्र श्री रविराज देशमुख यांच्या समवेत झाला. एक दिवस आम्ही आमच्या सर्व आय ए एस करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या दालनात गेलो .सर्वांनी अर्थातच वह्या पेन सोबत घेतले होते .विशाल आनंद सर काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशाल सरांनी आपल्या यशाची यशोगाथा मुलांना सांगितली.मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
त्यांच्याबरोबर फोटो काढले .
त्यांचे स्वागत केले .असा हा विशाल मनाचा माणूस पोलीस खात्यात राहून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद घेण्यासाठी फुलवण्यासाठी आज अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक पदी कार्यरत आहे .

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र ह्या त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमशील स्वभावामुळे चांगल्या चर्चेत आहेत. प्रशासन आपल्या दारी अशी काम करण्याची त्यांची पद्धत आहे. अतिशय सकारात्मक असलेल्या ह्या अधिकारी माझे मित्र श्री विशाल नरवाडे यांच्या बॅचमेट आहेत. त्या जेव्हा अमरावतीला सर्वप्रथम आल्या तेव्हा आम्ही त्यांचे सन्मानपत्र तयार केले. मा.लेडी गवर्नर श्रीमती कमलताई गवई यांच्या हस्ते आम्ही त्यांचे स्वागत केले .आमच्या नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे मी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी निमंत्रित करीत गेलो आणि त्यांनी देखील अतिशय उत्साहाने माझे निमंत्रण स्वीकारले .परवा माझी विद्यार्थिनी आयएएस झालेली पल्लवी चिंचखेडे अमरावतीला आली. मॅडमला भेटण्याचे तिची इच्छा होती .मॅडमने तिला ताबडतोब बोलावले. तिच्याशी चर्चा केली .तिचा संवाद घडवून आणला आणि तिच्याबरोबर सहभोजन पण घेतले. ओरीशा राज्यातून आलेल्या संजीता मॅडम खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या सनदी अधिकारी आहेत .

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे आपल्या विनम्र व शिस्तबद्ध कामामुळे आज सनदी अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचा माझा परिचय अकोला येथे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये झाला. तेव्हा ते अकोला येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते .आम्ही एक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा अकोला येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित केली होती .त्या कार्यक्रमाला सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परवा 13 जुलै रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई सर यांच्या मातोश्री मा. लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई यांच्या वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांना भेटणाऱ्यांची भरपूर गर्दी होती. मी जेव्हा गवई आई साहेबांकडे गेलो तेव्हा मला धक्का बसला .श्री सचिन सर स्वागत कक्षात बसून होते. मी त्यांना म्हटले सर आत चला .ते म्हणाले नाही जे लोक अगोदर आलेले आहेत त्यांना भेटू द्या. आपण शिस्तीचे पालन केले पाहिजे .एक आय ए एस अधिकारी प्रथम आलेल्या लोकांना प्रथम संधी देतो शिस्तीचे पालन करतो हे महत्त्वाचे आहे .मागे एकदा मी व मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई त्यांच्याकडे एका कामानिमित्त गेलो होतो. साहेब कमलताईंना म्हणाले आईसाहेब आपण कशाला आलात .आपण फोन केला असता तर मीच आपल्या भेटीला आलो असतो. मागे एका कामानिमित्त मी त्यांच्याकडे गेलो .काम नियमात बसणारे होते. लगेच त्यांनी उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे यांना मला माझ्या कामात मदत करण्यात सांगितले. इतकी तत्पर सेवा देणारा हा माणूस आज अमरावती महानगरपालिकेचा प्रचंड मोठा व्याप सांभारत आहे .

अमरावतीला अमरावती चांदुर रेल्वे रोडवर वडाळी या भागामध्ये एस आर पी कॅम्प आहे .यासाठी कॅम्पचे समादेशक आयपीएस अधिकारी श्री राकेश कलासागर हे आहेत. अमरावती पोलीस उपमहा निरीक्षक कार्यालयात कार्यरत असणारे श्री पाटील यांच्या स्वप्नील पाटील नावाचा मुलगा आयएएस झाला होता .आम्ही त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार आयोजित करीत होतो. असाच एक सत्कार आम्ही आमच्या अकोला केंद्रात म्हणजे बाबूजी देशमुख वाचनालयात आयोजित केला होता. श्री कलासागर तेव्हा अकोला येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते .त्यांना जेव्हा हे कळले की एक आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्याचा मुलगा सनदी अधिकारी झालेला आहे आणि तो अकोला येथे येत आहे तेव्हा आवर्जून त्यांनी आम्हाला त्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले आणि स्वप्निल पाटील यांचा अमरावती विभागातील अकोला पोलीस विभागातर्फे सत्कार केला आहे. आज अमरावतीला ते पोलीस विभागाला मदत करण्यासाठी एसआरपीचे जे युनिट आहे त्याचे समादेशक म्हणून काम करीत आहेत.

आज राष्ट्रीय नागरी सेवा दिवस. त्यानिमित्त या आमच्या सर्व अधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *