निर्भय सबला नारी
नभासारखे रूप तुझे
सागराएवढी खोली
नारीशक्तीची योग्यता
म्हणजे देवाची देहबोली!!१!!
आज स्पर्धात्मक युगात
आहे सर्व क्षेत्रात अग्रेसर
सरस्वतीचा आशीर्वाद
म्हणून नाही तिला डर!!२!!
घरातील साक्षात लक्ष्मी
तिला संस्कारांची जाण
आई वडिलांची शिकवण
विचारांची समृद्ध खाण!!३!!
बजावते अनेक भूमिका
समाजासाठी असे कर्तव्यदक्ष
तिच्या मेहनतीची, कष्टाची
काळच देत असतो साक्ष!!४!!
✒️ अर्चना भगत
दर्यापूर, अमरावती