Hurry Up Now The Deal is Here!

महाराष्ट्रातील रयत शिक्षण शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एड. गजानन फुंडकर यांची कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट राज्यस्तरीय जयंती उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. श्री सुरेश भट यांच्या जयंती उत्सवानिमित्त पूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून या सर्व उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र दिनी म्हणजे दिनांक 1 मे 2025 रोजी अमरावती पासून होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या जयंती उत्सव संपन्न करण्यासाठी आज अमरावती येथे एका सभेचे आयोजन अमरावतीची राष्ट्रीय संस्था मिशन आयएएस व युवा संवाद प्रतिष्ठानच्या वतीने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालया मागील आर डी फाउंडेशन मध्ये करण्यात आले होते .
कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट हे अमरावतीचे सुपुत्र असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे. तसेच त्यांच्या नावाने नागपूर येथे स्वर्गीय श्री सुरेश भट भव्य सभागृह उभारण्यात आले आहे .त्यांच्या कर्तुत्वाचा दखल घेऊन श्री सुरेश भट यांच्या स्मृतिपित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे समितीने ठरवले आहे. हा जन्मोत्सव संपन्न करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले असून त्या मध्ये सदस्य म्हणून सर्वश्री प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे श्री नितीन पवित्रकार अभिनंदन पेंढारी विराग जाखड नरेंद्र बोरकर राजेश देशमुख कुणाल निखिल वानखडे रावसाहेब वाटाणे शिवराज टेकाळे बंडोपंत भुयार सुभाष धोटे सचिन निर्मळ सुप्रसिद्ध वराडी लेखक श्री आबासाहेब कडू गिरीश सोळंके संदीप देशमुख यांचा समावेश आहे. आरडी फाउंडेशनचे श्री आर डी देशमुख यांनी त्यांच्या प्रतिष्ठान तर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत केले. एड. गजानन पुंडकर यांची स्वागत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. कार्यक्रमाची सांगता श्री नितीन पवित्रकार यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *