Hurry Up Now The Deal is Here!

आज सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिजाऊ रथयात्रा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्य कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले श्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रथयात्रेचा मार्गक्रमण सोहळा सुरू आहे.श्री पुरुषोत्तम खेडेकरसाहेबांचा माझा परिचय मराठा सेवा संघाच्या स्थापनेच्या वेळेस झाला. तेव्हा अकोल्याला मराठा सेवा संघाची स्थापन झाली होती .मी अमरावतीला मराठा सेवा संघामध्ये सहभागी झालो होतो .माझे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दामोदरपंत टेकाडे तत्कालीन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री वामनराव डहाणे व इतर सहका-यांनी व आम्ही अमरावतीची मराठा सेवा संघाची शाखा जुळवण्याच्या मार्गी लागलो .त्यासाठी इरवीन चौकातील लोकमान्य कॉलनीतील श्री अलोणे यांची जागा भाड्याने घेतली. कामाला सुरुवात झाली .पहिली भव्य सभा अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या लागून असलेल्या सभागृहात झाली. मा. श्री पुरुषोत्तम खेडेकरसाहेब या सभेला उपस्थित होते. त्यांची माझी ही पहिली भेट .माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मी मराठा सेवा संघाचा पहिला भव्यदिव्य कार्यक्रम अमरावतीला घेतला .तो म्हणजे सप्त खंजिरी वादक श्री सत्यपाल महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम. श्री सत्यपाल महाराजांची मराठा सेवा संघात एन्ट्री या कार्यक्रमाने झाली. श्री सत्यपाल महाराज माझे मित्र असल्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. फारसे मानधन घेतले नाही. परंतु अमरावतीचा इर्विन चौक त्या कार्यक्रमाने दणाणून गेला .अमरावतीच्या मराठा सेवा संघाची सुरुवात झाली ती अशी .नंतर श्री पुरुषोत्तम खेडेकरसाहेब अमरावतीला सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले आणि मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमांची रेलचेल संपूर्ण महाराष्ट्रात भव्य प्रमाणात सुरू झाली. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मला मिळाली. अमरावतीची शाखा सुरू झल्यानंतर दिनदर्शिका .मासिक पत्रिका. संमेलने. शाखा स्थापन करण्यासाठी पुढाकार यासाठी जे जे मला करता आले तेथे मी प्रामाणिकपणे केले .मी मराठीचा प्राध्यापक असल्यामुळे माझ्यावर सहाजिकच जास्त जबाबदारी होती .शिवाय प्राध्यापक असल्यामुळे आणि अमरावतीला माझे भारतीय महाविद्यालय असल्यामुळे मजजवळ वेळही भरपूर होता. मीआणि माझ्या सर्व सहकार्‍यांनी मराठा सेवा संघासाठी स्वतःला झोकून दिले ते केवळ खेडेकर साहेबांच्या स्वभावामुळे. खेडेकर साहेब म्हणजे अजब रसायन आहे. त्यांच्याबद्दल झालेत बहु होतील बहु परंतु या सम हा असेच म्हणावे लागेल. जितनेवाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंगसे करते है या शिव खेडाच्या चार ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात .आज मला आठवते .आज आमची जिजाऊ बँक दिमाखाने उभी आहे .या बँकेच्या स्थापनेमध्ये माझा मोलाचा वाटा आहे .मला आठवते खेडेकर साहेब मला म्हणाले अहो तुमचे ते सहकार विभागाचे सहनिबंधक श्री के इ हरिदास फार जवळचे मित्र आहेत ना ? त्यांना सांगून जिजाऊ बँकेला मान्यता द्या ना. जिजाऊ बँक स्थापनेचे प्रपोजल विभागीय सहनिबंधककडे पेंडीग होते .तेव्हाचे सहसंचालक मा.श्री के.ई.हरिदास हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. त्यांचे माझे कडे सतत जाणे-येणे असायचे .सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. मी व नलिनीताई लढके यांनी विदर्भ सत्यशोधक समाजाची अमरावतीला स्थापना केली होती .जिजाऊ बॅंकेचे नियोजित अध्यक्ष श्री अविनाश कोठाळे हे माझ्याकडे आले आणि त्यांनीदेखील जिजाऊ बँकेची मान्यता मिळवून देण्यासाठी मला विनंती केली .मी विभागीय सहसंचालक श्री के ई हरिदाससाहेबांना शब्द टाकला .काही तांत्रिक अडचणी होत्या .काही त्रुटी होत्या .परंतु मराठा सेवा संघाची एक चांगली बँक अमरावतीला उभे राहत आहे आणि मी शब्द टाकला आहे हे पाहून तेव्हाचे सहनिबंधक श्री के.ई.हरिदास यांनी बँकेला मान्यता दिली .आणि आज या बँकेचा पसारा संपूर्ण विदर्भात पसरला आहे .
खेडेकर साहेब आज केवळ मराठा समाजापुरते मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. खरं म्हणजे आपल्या कार्यकर्तृत्वाने या माणसाने महाराष्ट्रामध्ये स्वतःचा एक ठसा उमटविला आहे. खरं म्हणजे अशी माणसं फार कमी असतात .घरादारावर तुळशीपत्र ठेवून हा माणूस मराठा सेवा संघासाठी तसेच समकालीन समविचारी संघटनांच्या बांधणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरत होता. तेव्हा आमच्या साहित्य संगम बहुजन साहित्य परिषद विदर्भ सत्यशोधक मंडळ या सर्व संस्थांनी चांगलाच जोर पकडला होता .1976 पासून सामाजिक चळवळीमध्ये असल्यामुळे माझा प्रचंड परिचय परिचय होता. त्याचा फायदा मला मराठा सेवा संघाच्या च्या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रमाणात झाला .शिवाय माझ्या संघटना मी थोड्या बाजूला ठेवून मराठा सेवा संघासाठी पूर्णवेळ देऊ लागलो.
मला आठवते 2008 या वर्षी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आम्ही अमरावतीला घेतले. राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचे म्हणजे भव्य दिव्य काम. पण श्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या सतत मार्गदर्शनामुळे आम्ही तीन दिवसाचे राष्ट्रीय अधिवेशन व्यवस्थित होऊ शकलो.मी माझे मिशन आय.ए.एस.चे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवू अधिवेशनासाठी पूर्ण सहा महिने वेळ दिला आम्ही जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा केला आणि संमेलन यशस्वी करून दाखविले. खेडेकरसाहेबांकडे एक दिव्य दृष्टी आहे. दूरदृष्टी आहे .आणि तत्परता तेजस्वीता तपस्वीता आहे .ते बोलायला थोडे परखड आहेत .परंतु तेवढेच स्पष्टवक्ते आहेत.अमरावतीला आल्यावर ते नेहमी म्हणतात या काठोळेकडे पहा .हा माणूस सतत धडपडत असतो. नेहमी पुस्तकांचे प्रकाशन करीत असतो .त्यासाठी धडपड जास्त करतो.हा माणूस असा आहे की हेल्याचे देखील दूध काढू शकतो .याचा अनुभव स्वतः त्यांनी घेतला आहे .कारण मराठा सेवा संघाच्या सुरवातीच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी तन-मन-धनाने संघाच्या विकासासाठी विस्तारासाठी आमच्या घरादारावर तुळशीपत्र ते केवळ खेडेकर साहेबांकडे पाहून. खेडेकरसाहेब मराठा सेवा संघाचे काम करीत असले तरी त्यांचा परिचय सर्वदूर आहे .मला आठवते मा.श्री ह.रा. कुलकर्णी यांची अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. ते अमरावतीला रुजू व्हायला आले तर ते सरळ सर्किटहाऊसला गेले नाहीत तर श्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शासकीय बंगल्यावर आले आणि तेथेच फ्रेश होऊन विभागीय आयुक्त कार्यालयात गेले .एक विभागीय आयुक्त एका कार्यकारी अभियंताकडे येतो आणि तेथून तयार होऊन विभागीय आयुक्त कार्यालयात जातो ही गोष्ट म्हणजे खरोखरच खेडेकरसाहेबांच्या कर्तृत्वाची कमाल आहे .आज मराठा सेवा संघाचा पसारा सर्वदूर पसरला आहे .भारतातच नव्हे तर परदेशात देखील मराठा सेवा संघाच्या शाखा निघाल्या आहेत .याचे खरे श्रेय माननीय श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनाच जाते .खरं म्हणजे एवढा सगळा मोठा व्याप सांभाळून हा माणूस त्याच्या शासकीय कार्यालयात त्यांच्या शासकीय कामात तसूभरही मागे राहिलेला नाही. त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लागलेली पाटी पाहण्यासारखी असते .त्यावर लिहिलेले असते. आत मध्ये येण्यासाठी परवानगीची गरज नाही. मला असे वाटते आज प्रत्येक कार्यालयात मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या दारावर पाटी लागलेली असते .परवानगी शिवाय आत येऊ नये आणि खेडेकरसाहेब मात्र आपल्या दारावर लिहून जातात .आत येण्यासाठी परवानगीची गरज नाही .हा त्यांचा दृष्टिकोण.त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा व्यक्त करते .डॉ. पंजाबराव देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आम्ही जेवढे काही कार्यक्रम घेतले त्या सर्व कार्यक्रमाच्या पाठीशी खेडेकर साहेब समर्थपणे उभे राहिले .तसेच आम्ही बहुजन साहित्य परिषदतर्फे वरूडला बहुजन साहित्य संमेलन घेतले .या कार्यक्रमाला देखील साहेबांनी सढळ हाताने मदत केली व या दोन दिवसाच्या साहित्य संमेलनाला त्यांनी उद्घाटनाला स्वतः उपस्थित राहून आपला सहभाग दर्शविला .संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा संघाच्या शाखा स्थापन करणे. त्यांना अर्थसाहाय्य करणे. त्यांचे संघटन वाढवणे त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. कार्यकर्त्यांची ताकदही वाढवली. या सगळ्या दरम्यान घराकडे दुर्लक्ष होणे सहाजिकच आहे .परंतु खेडेकरसाहेबांच्या अर्धांगिनी सौ रेखाताईंनी ही बाजू अतिशय व्यवस्थित सांभाळली. त्यादेखील आमदार झाल्या. परंतु आमदार होऊनही त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सारख्याच वावरताहेत .कुठेही अहंकार नाही. कुठेही बडेजाव नाही .हा खेडेकरसाहेबांच्या व त्यांच्या कुटुंबीयांचा गुणविशेष आहे . मागे त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीकर यांनी पुढाकार घेऊन चिखलीला त्यांचा सत्कार तसेच त्यांनी लिहिलेल्या शुन्यांचा ताळमेळ या पुस्तकाचे प्रकाश ठेवले होते. पुण्याला देखील बालगंधर्व सभागृहात त्यांचा भव्य असा सत्कार झाला होता.अशा या कर्तत्वान तेजस्वी युगपुरुषाला आमच्या हार्दिक शुभेच्छा .खेडेकर साहेब तुम्ही असेच चांगले काम करीत राहा .तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही सदीच्छा.

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *