आई नावाच्या शाळेत
बाबांच्या नावाची पाटी घेऊन
मुलाने आईच्या शाळेत बसायचं
फक्तच सहा तास विद्यालयात
उर्वरित तिच्या छायेत शिकायचं
तिचं मुलाचं पहिलं विद्यापीठ
तिच्या संस्कारात तो होतो धीट
कधी प्रेमाने तर कधी चिडून
ती रचत जाते इमारतीची वीट
दंगामस्ती ,मोबाईल , कार्टून
आई त्रुटिंची पुसून टाकते खूण
नित्यनेमाने संवाद साधत भरते
त्यांच्या भावविश्वात उत्तम गुण
आनंद , यश विकसित करण्यात
वाचन, संगीत पर्याय शोधण्यात
सुखासंगे दुःखही पचवायला देत
यशस्वी संवेदना तरल ठेवण्यात
हळूहळू सगळंच कसं तिच्यातले
काळाने त्यांच्यात उतरतं जातं
तिच्या उणिवांवर मात केलेल्या
कलाकृतीत मन भारावून जात.
शैलजा लोखंडे गोरडे
लक्ष्मी नगर रींग रोड वरूड
7038251196