Hurry Up Now The Deal is Here!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे सल्लागार तसेच पुणे विभागाचे विभागीय आयुक्त या पदावर कार्यरत राहिलेले डॉ. दीपक म्हेसेकर माझे मित्र आहेत.. एवढ्या मोठ्या उच्च पदावर राहिलेला माणूस आमच्या सारख्या चळवळीतल्या माणसाची दखल घेतो हे – खरोखरच – जितनेवाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंगसे करते है – या शिव खेडाच्या ओळीशी मिळची जुळती आगळीवेगळी वागणूक आहे.मा. श्री दीपक म्हैसेकर यांची माझी पहिली भेट नांदेडला असताना झाली .माझे मित्र व पत्रकार श्री संजीव कुलकर्णी यांनी माझा नांदेडच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव सभागृहामध्ये मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आठवणीने मला श्री राधेश्याम मोपलवार आयएएस व श्री दीपक म्हैसेकर आयएएस यांच्या भेटीला येऊन गेले. ती माझी पहिली भेट. या पहिल्याच भेटीत त्यांनी मला जिंकले. माझ्या चळवळीची आपुलकीने चौकशी केली आणि आपण या भागात ही चळवळ समर्थपणे राबवू असे आश्वासनही दिले .शिवाय त्यांनी ज्या मनमोकळ्या गप्पागोष्टी केल्या त्यावरून माणसाच्या मनाचा मोठेपणा लक्षात आला. नांदेडला व नांदेड जिल्ह्यात कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. पण त्यानंतर ते चंद्रपूरला जिल्हाधिकारी म्हणून गेले व आपण काठोळे सरांना त्यांचे मी आयएएस अधिकारी होणारच हे कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले होते ते ही गोष्ट विसरले नाहीत. मी जेव्हा चंद्रपूरला त्यांना भेटलो व मिशन आयएएस हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी विनंती केली .त्यांनी ती तात्काळ मान्य केले व प्रोबेशनवर असणाऱ्या आयएएस अधिकारी श्री गोयल यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. चंद्रपूरच्या प्रियदर्शानी इंदिरा गांधी ह्या भव्य नाट्यगृहामध्ये माझा मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम संपन्न झाला. नेमकी त्याच दिवशी साहेबांची नागपूरला विभागीय कार्यालयात मिटिंग निघाली.ती मिटिंग आटोपून साहेब वेगाने माझ्या कार्यक्रमाला आले आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी माझा सत्कार व आभार मानले .या कार्यक्रमाचा इतका जबरदस्त परिणाम झाला की मला चंद्रपूर जिल्ह्यातून भरपूर निमंत्रणे आले. भद्रावती वरोरा राजुरा मूल ब्रह्मपुरी कोरपना इत्यादी ठिकाणीच्या महाविद्यालयामध्ये तसेच विद्यालयांमध्ये मी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या. त्याला कारणीभूत ठरला तो दीपक म्हैसेकरांनी घेतलेला चंद्रपूर येथील कार्यक्रम .साहेब तेव्हा तिथे जिल्हाधिकारी होते आणि माझ्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे .यासाठी त्यांनी संबंधितांना तशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे माझ्या कार्यक्रम जेव्हा चंद्रपूरच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात झाला तेव्हा तेथे पाय ठेवायला देखील जागा नव्हती. साहेबांच्या पुस्तक प्रकाशनची पत्रिका जेव्हा आली आणि त्यांनी आग्रहाने बोलावले तेव्हा मी पुण्याला जायचे ठरवले .माझ्याबरोबर माझे मित्र प्राध्यापक सुभाष नलांगे यांना देखील सोबत घेतले. एक संवेदनशील अधिकारी एक क्रियाशील अधिकारी आणि विभागीय आयुक्त असताना तसेच शासनाच्या सेवेत असताना सातत्याने काम करणारा व कोविडच्या काळामध्ये खंबीरपणे सातत्याने कार्यरत राहणारा .सांगली कोल्हापूरला पूर आले असतानाही तिथे परिस्थिती नियंत्रणात ठेवणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री दीपक म्हैसेकर साहेबांचा नावलौकिक आहे आणि आज ते निवृत्त झाले असले तरी त्यांच्या नावाचा बोलबाला प्रशासनामध्ये आहे. – जितनेवाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंगसे करते है – असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. .

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *