Hurry Up Now The Deal is Here!

गुढीपाडवा

नवे संकल्प नव्या विचारांची उभारू उंच गुढी
पवित्र संस्कृतीत साकारलेली परंपरागत रुढी

नव दिवसाच्या आगमनाने नव्या वर्षाची सुरुवात
परोपकारे दिपून टाकू तेजाची स्नेह फुलवात

निराशेची झटका मरगळ तत्परतेने व्हा जागे
जीवनाचे वस्त्र विणू या घेऊनी घट्ट स्नेह धागे

सुखदुःखावर मात करुनी मार्ग क्रमू प्रगतीचा
विश्वशांतीचा कलश सजवूनी गाऊ गौरव भारताचा

दीर्घायुष्य शतायुषी होवो मराठमोळे वर्ष
स्वागताला घेऊन उभी माझ्या मनातील हर्ष

मंगलदिनी मंगल वर्षी खंत नसु दे उरी
मांगल्याचा कलश डोलतो देखण्या गुढी वरी

सौ चित्रा पुरुषोत्तम चौधरी
सिद्धिविनायक नगरअमरावती
444 604

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *