भारताचे केंद्रीय मंत्री ना.श्री नितीन गडकरी हे येत्या शनिवार दिनांक 22 मार्च 2025 अमरावतीला येत असून ते अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवरील असलेल्या श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत.आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हृदय रुग्णांसाठी संजीवनी देणारी संस्था म्हणून अमरावतीच्या श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचा उल्लेख करावा लागेल. या संस्थेने अल्पावधीमध्ये जी प्रगती केलेली आहे की निश्चितच नोंद करण्यासारखी आहे. श्री संत अच्युत महाराज हे माझे शेजारी. अनेक वर्ष आम्ही सोबत राहिलो. महाराजांचे सर्व फोन माझ्या लँडलाईन नंबर वर यायचे. या हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या काळापासून तर आजच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यापर्यंत अनेक घडामोडी माझ्या समोर घडल्या आहेत. खऱ्या अर्थाने रुग्णांना योग्य सेवा देणारी योग्य मार्गदर्शन करणारे अनाठाई खर्चापासून वाचवणारी आरोग्य सेवा देणारी संस्था म्हणून या श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचा नावलौकिक आहे आतापर्यंत या दवाखान्यामध्ये 64,310 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि यातीलही 95 टक्के शास्त्रक्रिया ह्या केंद्र व राज्य संस्थेच्या योजनेतून झालेल्या आहेत. आजकाल हार्ट हॉस्पिटलच्या नावाखाली काही दवाखान्यांमध्ये रुग्णांची लूट सुरु आहे .कारण नसताना शस्त्रक्रिया होत आहेत .पैशाची नासाडी होत आहे .त्याबरोबर शरीराची पण नासाडी होते. पण संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल याला अपवाद आहे.
परवा माझी बहीण या दवाखान्यामध्ये गेली. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या आजारावर दोन तीन लाख रुपये खर्च केले आणि इथे जेव्हा तपासण्या केल्या तेव्हा तिला कोणताच आजार नसल्याचे व हृदयाचा कोणताच त्रास नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला खर्च आला फक्त तीनशे रुपये.. तिने लाखो रुपये खर्च तर केलाच पण ज्या कारण नसताना गोळ्या घेतल्या त्या तिच्या शरीरावर किती दुष्परिणाम करून गेल्या असतील आणि भविष्यात त्याचा तिला किती त्रास होईल ते वेगळेच. श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये मात्र तिला केवळ तीनशे रुपयांमध्ये कोणताही आजार नसल्याचे सप्रमाण सिद्ध करून दाखवण्यात आलं. काही वर्षांपूर्वी माझी पत्नी सौ विद्या हिच्या छातीत दुखायला लागलं .अमरावतीचे बहुतांश डॉक्टर हे माझे मित्र आहेत .त्यातीलच एका तज्ञ व मित्र डॉक्टरांकडे मी गेलो. त्यांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. योगायोगाने त्या दिवशी त्यांच्याकडे हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्या डॉक्टर मित्रांनी त्यांच्या परीने तपासले आणि मला म्हणाले तसे काही नाही आहे .पण रिस्क नको म्हणून त्यांनी त्यांच्या परिसरात असलेल्या व नव्याने निर्माण झालेल्या दवाखान्यात पाठवले. तिथल्या डॉक्टरांनी तपासले .तिथले डॉक्टर मला म्हणाले .ताबडतोब बायपास सर्जरी करावी लागते. मला ते स्क्रीनवर हृदयाच्या हालचाली दाखवू लागले. मी तर तज्ञ माणूस आहे. स्क्रीनवर दाखवले आहे म्हणून घाबरून थोडा जाणार आहे. मी त्यांच्याकडून रिपोर्ट घेतला. माझ्या डॉक्टर मित्राला फोन केला .डॉक्टर मित्र म्हणाला तुम्ही उद्या संत अच्युत महाराज हॉस्पिटलमध्ये परत चेक करा. आम्ही डॉक्टर मित्राच्या सल्ल्याप्रमाणे श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल मध्ये गेलो तिथल्या तज्ञ डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट पाहिले .योग्य त्या टेस्ट घेतल्या आणि सायंकाळी आम्हाला सांगितले तुमच्या पेशंटला काहीही झालेले नाही आहे. ज्या डॉक्टरांचा तुम्ही रिपोर्ट आणलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. तुम्ही त्या डॉक्टरांना कोर्टात पण खेचू शकता.
मी विचार करायला लागलो इतका चुकीचा रिपोर्ट त्या डॉक्टरांनी दिला. मला संगणकावरील हृदयाच्या हालचाली दाखवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मी खंबीर होतो आणि दुसरे तज्ञ डॉक्टर माझ्या सोबतीला होते आणि त्यांनी श्री संत अच्युत महाराज हार्ड हॉस्पिटलचा मार्ग दाखविला होता त्यामुळे मी एका शस्त्रक्रियेतून वाचलो होतो. माझ्या ठिकाणी दुसरा माणूस असता तर तो त्या डॉक्टरांच्या अयोग्य सल्ल्याला बळी पडला असता. पैशाचे सोडा.काही कारण नसताना एक शस्त्रक्रिया उगीचच झाली असती.हे दोन अनुभव पाठीशी आहेत.
श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलची सुरुवात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती मोती नगरातून. श्री प्र.वा.जावरकर नावाचे गुरुजी होते. त्यांनी सुरुवातीला या कामाला सुरुवात केली. मुंबईचे डॉक्टर येऊन अमरावतीला तपासायचे व त्यांना आवश्यक आहे अशा रुग्णांना मुंबईला शस्त्रक्रियेला बोलवायचे. त्यानंतर डॉक्टर सुभाष अरोरा धीरूभाई सांगानी इंजिनिअर उषा ठुसे व इंजिनिअर श्री पोतदार यांनी जीवाचे पाणी केले. घर दारावर पाणी सोडले .मी याचा साक्षीदार आहे. उषा ठुसे आणि पोद्दार दवाखान्याच्या वर्गणीसाठी मोटरसायकलवर डबल सीट फिरायचे. धीरूभाई सांगानी पण त्यांच्याबरोबर राहायचे.तेव्हाचा काळ वेगळा होता .आता सारख्या भराभर देण्या मिळत नव्हत्या. त्या काळात या लोकांनी या दवाखान्याची पालेमुळे पक्की केली.. ही मंडळी श्री संत अच्युत महाराज यांना रिपोर्टिंग करायला आमच्या शेजारी यायचे. उषाताई मला नेहमी म्हणायचे सर काही देणगीदार मला द्या. त्यांची ही मागणी हृदयापासून असायची. त्यांची पोटतिडीक मी जाणून होतो. आज जेव्हा या दवाखान्याची प्रगती मी पाहतो आणि प्रामाणिकपणे योग्य सल्ला देणारा योग्य शस्त्रक्रिया करणारा दवाखाना म्हणून या दवाखान्याला जी व पावती मिळाली आहे ते मिळायला आयुष्य खर्ची घालावी लागते..
श्री संत अच्युत महाराज यांचे शिष्य श्री सचिन देव महाराजांना स्पर्धा परीक्षेला बसायचं होतं .ते अच्युत महाराजांचे शिष्य. ते पहिल्यांदा माझ्याकडे आले. मी काही गोष्टी त्यांना सांगितल्या .त्या त्यांनी पाळल्या. आज जरी ते स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाले नसले तरी लोकांच्या पसंतीला श्री संत अच्युत महाराजांचे शिष्य म्हणून तंतोतंत उतरले आहेत. श्री संत अच्युत महाराजांचा वारसा ते प्रामाणिकपणे पुढे चालवत आहे त.
आज अमरावती शहरामध्ये केंद्रीय मंत्री व खऱ्या अर्थाने एक समृद्ध व्यक्तिमत्व असलेलं माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व ना.श्री नितीन गडकरी यांच्या रूपाने या रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करणार आहे.. आज रुग्णालयाचा विस्तार फार मोठा झाला आहे .डॉक्टर अनिल सावरकर तसेच आमचे नातेवाईक आणि तळेगाव ठाकूरचे सुपुत्र श्री सुधीर दिवे संत सचिन देव महाराज आणि अनेकांचे हातभार या वास्तूसाठी लाभले आहे. ज्या हृदय रुग्णांना मुंबईला जावे लागत होते .नागपूरला जावे लागत होते
. मोठा खर्च करावा लागत होता. त्यांना अमरावतीला घर बसल्या तेही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेमधून विनामूल्य सेवा उपलब्ध झाली आहे . राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शिष्य असलेल्या श्री संत अच्युत महाराजांनी अमरावती विभागातील हृदय ग्रस्त लोकांची निकड लक्षात घेऊन या रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली ही खरोखरच अमरावती शहराच्या इतिहासातील महिलाचा दगड ठरावी अशी घटना आहे. या दवाखान्यासाठी ज्यांनी तन-मन-धनाने आर्थिक सहकार्य दिले त्यांनी सेवा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथल्या दवाखान्यात असणारे डॉक्टर्स तसेच इतर सर्व कर्मचारी हे जास्त सेवाभावी वृत्तीने काम करतात .त्यामुळे आज हे रुग्णालय भरभराटीला आलेले आहे. या रुग्णालयाच्या भरभरासाठी झटणाऱ्या आपला वेळ देणाऱ्या सर्व मान्यवरांना मानाचा मुजरा.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003