कविता दिनानिमित्त
संतांची चमकली
शाहिराची झळकली
अर्वाचीन प्राचीन
अभिजात कविता
भाषेवरील हुकूमत
आभासी हिंदकळत
प्रचितीत सामर्थ्याच्या
विभूषित कविता
दृष्टीतली विपुलता
जाणिवेतली विफलता
आशयगर्भित उपहासाने
विद्रोही कविता
समाजाभिमुख वृत्ती
दीनदुबळ्याची कृती
नैराश्याच्या रसायनात
आशावादी कविता
भावस्निग्ध अर्थरम्य
प्रेमभावना तारतम्य
निडर बेफिकीर
स्नेहमय कविता
आर्तता आकाशवेडी
अध्यात्मिक बाराखडी
शारदेच्या स्मरणार्थ
परमानंद कविता
शैलजा लोखंडे गोरडे
लक्ष्मी नगर रींग रोड,वरूड
7038251196