Hurry Up Now The Deal is Here!

महसूल विभागाच्या आदेशाने घरकुल लाभार्थीस मिळणार 5 ब्रास वाळू मोफत आणि इतरां बांधकामासाठी 1300 रुपये दराने 10 ब्रास वाळू मिळणार आहे.

राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.

एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यामाध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 60 हजार घरकुल लाभार्थीना शासनाचे वाळू धोरण अंतिम होण्याची वाट पाहावी लागणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील बठाण ता. मंगळवेढा येथील ठेक्यावर उपलब्ध वाळुसाठी जिल्ह्यातील लोक ऑनलाइन नोंदणी करून वाळूची मागणी करू शकता. वाळूच्या उपलब्धतेनुसार आपणाला वाळू मिळणार आहे.

त्यासाठी काही कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या महाखानिज या ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. उतारा, लाभार्थ्यांचे आधारकार्ड बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळू उपलब्ध असल्यावर त्या साठी स्वतंत्र नोंदणी करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *