लोकं
बरं बोललं की भाळतात लोकं
खरं बोललं की टाळतात लोकं
जाणून घेतल की कळतात लोकं
प्रामाणिकपणे वागल की छळतात लोकं
ओल्यालाही सुक्या बरोबर जाळतात लोकं
माणुसकीतही कंजूशी पाळतात लोकं..
नशिबानेच चांगली मिळतात लोकं
चांगल्या नशिबावरही जळतात लोकं.
दुःखाचे कढ आतल्या आत गिळतात लोकं
अनोळखी असूनही प्रेमाने जुळतात लोकं
आपल्याच माणसांची चर्चा चघळतात लोकं..
अरिष्ट येता परके बनवून न्याहाळतात लोकं
वास्तव विसरून दिखाव्याला भाळतात लोक
खोटीच सहानुभूती अन खोटे आसू गाळतात लोक..
प्रलोभाना पुढे कित्तेक पघळतात लोक..
सज्जनाला चंदना प्रमाणे उगाळतात लोक..
मदतीची गरज असली की दूर पळतात लोकं
सगळं चांगलं झालं की येऊन मिळतात लोकं.
सुजाता पुरी
अहील्यानागर
8421426337