Hurry Up Now The Deal is Here!

8 मार्च संपूर्ण जगात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. जागतिक महिला दिन आणि आपला स्वतःचा वाढदिवस एकाच दिवशी आले तर दुग्ध शर्करा योग. हा योग एका महिला आयएस अधिकाऱ्यांच्या वाट्याला आलेल्या आलेला आहे. त्या आयएएस अधिकारी म्हणजे डॉक्टर निधी पांडेय.नुकतीच त्यांची अमरावतीच्या विभागीय आयुक्त पदावरून बदली झाली आहे.
निगर्वी संयमी परोपकारी कार्यतत्पर विभागीय आयुक्त किंवा आयएएस अधिकारी कसा असावा त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर निधी पांडेय.चांगले काम केल्यामुळे निधी पांडेय मॅडम यांच्या ठिकाणी वरील सर्व गोष्टीचा समन्वय झालेला आहे. ज्या कालावधीमध्ये त्या अमरावतीमध्ये होत्या .या ना त्या कारणाने त्यांच्या माझ्या भेटी होत गेल्या. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक पैलू उलगडत गेला.

ज्येष्ठ नागरिकांविषयी सन्मान सर्वसामान्य माणसाचे काम तत्परतेने करण्याची प्रवृत्ती कार्यालयीन कर्मचाऱ्यांना काम कसे करावे याचे आपल्या वागण्यातून प्रशिक्षण देणारे त्यांचे व्यक्तिमत्व अमरावती विभागाच्या प्रशासनावर आपली छाप पाडून गेले आहे. माझी त्यांची पहिली भेट झाली तीच माझ्या जीवनामध्ये दीर्घकाळ लक्षात राहील. सुप्रसिद्ध लेखक व वागते श्री शिव खेडा यांनी म्हटले आहे

जितने वाले कोई अलग काम नही करते
वेऔ हर काम अलग ढंग से करते है.

मॅडमच्या बाबतीत मला हाच अनुभव सतत येत गेला.
आमच्या पहिल्या भेटीत मॅडमनी मिशन आय ए एस समजावून घेतले. त्यांच्या कार्यालयात मी जेव्हा त्यांना निमंत्रण देण्यासाठी उभा राहिलो तेव्हा त्या देखील निमंत्रण घेण्यासाठी उभ्या राहिल्या. एक उच्चपदस्थ सनदी अधिकारी जेष्ठ नागरिकांनी दिलेले निमंत्रण स्वीकारण्यासाठी उभा राहतो. यामध्ये त्यांची विनयशीलता जेष्ठ नागरिकाप्रति कृतज्ञता आणि आदर्श प्रशासन कसे असावे समाजाभिमुख कसे असावे याची प्रचिती त्यांच्या वर्तनातून मला त्यादिवशी आली. मिशनच्या कामामुळे त्या भारावून गेल्या. फक्त एक रुपयामध्ये आय ए एस चे प्रशिक्षण दिल्या जाते हे पाहून त्यांनी माझ्या कामाची तोंड भरून स्तुती केली. सर्वात महत्त्वाचे मी जेव्हा जायला निघालो तेव्हा मॅडम स्वतःच्या खुर्चीतून उठून त्यांच्या केबिनच्या बाहेरच्या दारापर्यंत मला सोडायला आल्या. त्यांचा सगळा स्टाफ अधिकारी व कर्मचारी वर्ग पाहतच राहिला. इतकी विनायशीलता खरोखरच नोंदणीय आहे .

त्यांच्या कार्यतत्परतेचा माझा अनुभव असाच नमूद करण्यासारखा आहे. माझा प्रशांत भाग्यवंत नावाचा आयएएस करणारा विद्यार्थी अकोल्याचा राहणारा आहे. अकोल्याच्या महानगरपालिकेत त्याचे एक नियमानुसार होणारे काम होत नव्हते. प्रशांतला मॅडम विषयी माझ्या मार्फत कळले . प्रशांतने त्याचे काम मला सांगितले. काम नियमात बसणारे होते. फक्त विलंब लागत होता. मी प्रशांतला घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. मॅडमची भेट घेतली. प्रशांत ने कामाचे स्वरूप समजावून सांगितले. मॅडमने ते काळजीपूर्वक ऐकले आणि त्यांना ते पटले. आणि लगेच विभागीय आयुक्त कार्यालयातून अकोला महानगरपालिका आयुक्तांना फोन लावला आणि प्रशांतला नियमानुसार सहकार्य करण्याचे सांगितले. जे काम कित्येक महिने रेंगाळले होते ते मॅडमच्या एका फोनमुळे मार्गी लागले.

निधी पांडे मॅडमचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना एक शिस्त लावली ती म्हणजे रोजचे काम रोज करणे .कुठलाही अर्ज आला कुठलाही कुठलेही काम आले तर त्याचा निपटारा त्याच दिवशी करायचा .त्यासाठी त्यांनी सर्वांना सूचना दिल्या आणि समजा त्या दिवशी ते काम झाले नाही तर ते दुसऱ्या दिवशी प्रथम सत्रात पटलावर घ्यायचे. त्याचा निफ्टारा अगोदर करायचा .मग दुसऱ्या कामाला हात लावायचा. याचा प्रत्यय मला त्यांच्या कार्यालयात वारंवार येत गेला. विशेषता त्यांचे स्वीय सहाय्यक व तेथील कर्मचारी आज कोणती कामे करायची आहेत कोणती कामे झाली जी झाली नाही ती उद्याच्या लिस्टमध्ये यादीमध्ये अग्रक्रमाने टाकण्याचा पायंडा त्यांनी टाकला. ज्या कामाला मॅडमच्या अनुमतीची गरज नाही अशी कामे देखील लवकर व्हायला लागली.

अंकित राणे हा माझा अतिशय हुशार विद्यार्थी. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर समर्पक उत्तर तो एका मिनिटात देतो. दुसरा मिनिटच लागत नाही. त्याला मॅडमच्या भेटीला जायचे होते. मी बाहेर गावी होतो. संकेत मलकापूरहून आला होता. मी मॅडमला फोन केला आणि अनुमती मागितली. मॅडमनी ती लगेच दिली. अंकितशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. या तरुण वयात त्या मुलाचा अभ्यास पाहून मॅडम देखील आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी लगेच प्रोबेशनवर असणारे सनदी आयएएस अधिकारी यांची आणि अंकित ची भेट करून दिली आणि अंकितला आयएएस होण्यासाठी जी काही मदत लागते ती करण्याची सूचना पण केली. एक नुकताच सनदी अधिकारी झालेला अधिकारी अंकितला देऊन त्यांनी अंकितला अभ्यासामध्ये तसेच त्रुटी असत्या त्या दूर करण्यामध्ये हातभार लावला. असा हा मॅडमचा परोपकारी स्वभाव.

त्या तंतोतंत शिस्तीचे पालन करतात. त्यांना वडिलांना घेऊन अयोध्येला जायचे होते. त्यांचे वडील नरेंद्रनाथ हे देखील आयएएस अधिकारी आहेत म्हणजे आता सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या आई-वडिलांवर मॅडमचे नितांत प्रेम आहे. आपला पालकांसहित त्या अयोध्येला पोहोचल्या. खर म्हणजे विभागीय आयुक्त यांना लाईन मध्ये उभे राहण्याची गरज नसते. त्यांनी ओळख सांगितली तर आत मध्ये सन्मानाने प्रवेश मिळतो. पण मॅडम इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे दर्शनासाठी लाईन मध्ये उभे राहिल्या आणि आपला नंबर आल्यानंतरच त्या आत मध्ये गेल्या. इतके शिस्त आणि नियमांचे पालन त्यांनी केले आणि आपल्या मधील सभ्यपणा या माध्यमातून त्यांनी व्यक्त केला.

 मॅडमच्या वडिलांच्या वाढदिवस होता. मॅडमनी सर्व रिझर्वेशन करून ठेवले होते. वेळेवर माननीय नामदार मुख्यमंत्री यांचा दौरा आला. योगायोगाने मॅडमची माझी भेट झाली. मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला जाऊ शकत नाही याबद्दल त्यांना थोडे वाईट वाटत होते. मी त्यांना म्हटले मॅडम काही काळजी नका करू. मी तुमचा तुमच्या वडिलांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करण्याची व्यवस्था करतो. आमचे उत्तर प्रदेश मधील मेरठचे मित्र श्री उमेश कुमार पटेल यांच्या कानावर मी ती गोष्ट सांगितली. त्याने लगेच लखनऊला त्यांच्या मित्रांना सन्मानपत्र व स्वीटचा बॉक्स घेऊन पाठवले. त्यांच्या वडिलांना खूपच आनंद झाला. अमरावतीला आपल्या वाढदिवसाची दखल घेतल्या गेली आणि अमरावतीच्या माणसाच्या पुढाकाराने त्यांचे प्रतिनिधी आपल्या घरापर्यंत आले हे पाहून त्यांना गहिवरून आले .त्या भावना त्यांनी फोनवरून माझ्याशी व्यक्त केल्या. 

निधी पांडे मॅडमनी जे काम केले त्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. निवडणुकीमध्ये त्यांनी पाचही जिल्ह्यांचा दौरा करून लोकांमध्ये जी जनजागृती केली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागाने त्यांचा सन्मान केला .खरं म्हणजे सातत्याने समाजाभिमुख राहून विनयशीलतेने तत्परतेने कामे कशी करावीत याचा आदर्श निधी पांडे मॅडमनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त व त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प महाराष्ट्र
9890967003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *