अनेक जणांना फक्त एक पेटंट मिळवण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च घालावे लागते. जागतिक कीर्ती वर हा बहुमान प्राप्त होणे म्हणजे कठीणच बाब आहे. कधी कधी तर आयुष्य खर्च करूनही पेटंट प्राप्त होत नाही. पण आमच्या अमरावती शहरात एक असे संशोधक आहेत ; एक असे प्राचार्य आहेत आणि एक असे शास्त्रज्ञ आहेत ही ज्यांच्या नावावर एक दोन नव्हे तर चक्क 37 पेटंटची नोंद झालेली आहे .त्या माणसाचे नाव आहे प्राचार्य विजयराव इंगोले. पण सर्वजण त्यांना व्हि.टी. इंगोले म्हणूनच ओळखतात
पूर्ण संशोधनाला वाढलेला हा माणूस खऱ्या अर्थाने संशोधक आहे .आपण ज्याप्रमाणे पुस्तके वाचतो त्याप्रमाणे यांचा प्रत्यक्ष संशोधनासाठी दिलेला आहे. सकाळ संध्याकाळ दुपार रात्र संशोधन म्हणजे संशोधनच आणि त्यामुळे एक दोन नव्हे तर त्यांच्या गाठीशी आहेत 37 पेटंट. आपले पूर्ण आयुष्य संशोधनाला वाढलेल्या या माणसाला खरोखरच मनापासून सलाम करावासा वाटतो
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवर या माणसाने ग्रीन सर्कल नावाचे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारले आहे. तिथे सातत्याने त्यांचे संशोधन सुरू असते .बरं हा माणूस फक्त संशोधन केंद्र स्थापन करून थांबला नाही तर आपल्याबरोबर इतरांनीही संशोधन करावे व त्याला सर्व प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी त्यांनी ग्रीन सर्कल हे आपले संशोधन केंद्र सर्व संशोधकांसाठी मोकळे केलेले आहे. तुम्ही संशोधनासाठी या. तुमच्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी या ग्रीन सर्कल या संशोधन केंद्रामध्ये प्रा इंगोलेसर व त्यांच्या सहचारिणी डॉ. इंदिरा इंगोले यांनी केलेल्या आहेत.
एवढे मोठे संशोधन करूनही आणि 37 पेटंट नावावर असूनही या माणसाने आपले अमरावती हे गाव सोडले नाही. अमरावतीवर त्यांचे नितांत प्रेम आहे आणि म्हणून याच गावात राहून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे .त्यांना असे वाटते की अमरावती परिसरातील संशोधकांना काही मार्गदर्शन लागले .काही सुविधा लागल्या तर आपण त्यासाठी तत्पर असलो पाहिजे. आपल्याही पडत्या काळात अनेक लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला मदत करणे त्याचे आयुष्य उभे करण्यासाठी त्याला हातभार लावणे आणि त्यांच्यामधील संशोधक वृत्ती वाढावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार माणूस म्हणजे प्राचार्य डॉक्टर इंगोलेसर.
सर आता प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचे वय जरी आज 78 असले तरी त्यांचा काम करण्याचा उत्साह हा तरुणासारखाच आहे. अनेक तरुणांचे आयुष्य त्यांनी उभे केलेले आहेत आता आमच्या अमरावतीचीच गोष्ट घ्या ना अमरावतीला एक उद्योजक आहेत श्री अमित आरोकर . या उद्योजकाच्या पाठीशी ते समर्थपणे उभे राहिले .आपले एक वर्ष त्यांनी या तरुणासाठी दिले. त्याची सोलर कंपनी पूर्ण भारतामध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेली आहे. अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त टर्नओव्हर असणारा उद्योजक म्हणजे अमित आरोकर. इंगोले सर या मुलाच्या पाठीशी उभे राहिले नसते तर आज हा राष्ट्रीय पातळीवर आपला उद्योग मिळू शकला नसता.
सर पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा पी आय सी टी या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. अतिशय शिस्तबद्ध वक्तशीरपणा आणि शैक्षणिक अभ्यास ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. अनेकांना त्यांनी आयुष्यात उभे केले आहे तसेच विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत आणि आजही ते करीत आहेत. पुण्यानंतर हे अमरावतीला सुप्रसिद्ध अशा स्व. शिक्षण मंत्री श्री.राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रुजू झाले आणि आपल्या कार्यकाळात त्यांनी महाविद्यालयाचे स्वरूप खऱ्या अर्थाने तांत्रिक बनवले.
मिशन आय ए एस या चळवळीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. संशोधनाबरोबरच हे काम त्यांना रुचकर वाटले आणि त्यासाठी देखील आपले योगदान त्यांनी दिले .दरवर्षी त्यांच्या ग्रीन सर्कलमध्ये मुलांना आयएएस करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत .त्यासाठी इंगोले सरांनी आपले प्रशिक्षण केंद्र या कामासाठी सदैव उपलब्ध करून दिलेले आहे.
सरांनी आपले पूर्ण आयुष्य संशोधनासाठी अर्पित केले आहे .तर त्यांच्या सौभाग्यवती आणि डॉक्टर असलेल्या इंदिरा इंगोले यांनी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या बंगल्यामध्ये किमान 2 हजार झाडे असतील. त्यात फुलझाडे आहेत .त्या सर्वांचे संगोपन इंदिरा मॅडम त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे करतात .
अमरावती शहरातील एक आदर्श जोडपं म्हणून श्री इंगोले व डॉ. इंदिरा इंगोले यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी शोधून काढलेली अंबादेवी लेणी हे कालांतराने अमरावती जिल्ह्यात इतिहासात क्रांती करणार आहे. मोर्शी तालुक्यात सालबर्डीच्या जंगलात यांनी अंबादेवी लेणी शोधून काढली. त्या काळची चित्रे आज त्या लेणीमध्ये आहेथ.त्यासाठी त्यांनी संशोधन केले. रानावनात भटकंती केली. छायाचित्रण केले व अशा प्रकारच्या लेणी आपल्या विदर्भातील सालबर्डी जवळ आहेत हे लोकांना अवगत करून दिले.
माझी एक विद्यार्थिनी आहे. प्राजक्ता बोरकर तिचे नाव .ती बारावीच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्या काळात पहिली आली .शिकण्यासाठी पुण्याच्या पी आय सी टी महाविद्यालयात गेली. वस्तीगृहाला राहू लागली वस्तीगृहातील मुलींनी तिची रॅगिंग घ्यायला सुरुवात केली. ती अमरावतीला आली.तिचे पालक मला भेटले .मी इंगोले सरांशी संपर्क साधला .तेव्हा ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते सर तिच्या पाठीशी उभे राहिले आणि रॅगिंगचा प्रकार त्यांनी महाविद्यालयातून समोर नष्ट केला . प्राजक्ताचे आई-वडील जरी अमरावतीला असले तरी तिचे शैक्षणिक वडील म्हणून प्राचार्य इंगोले सर यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले .मुलगी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि आता मोठ्या पदावर काम करीत आहे .
आज-काल कचऱ्याची त्याच्या विल्हेवाटाची प्रमुख मोठी समस्या ही झालेली आहे. पण रस्त्यावर असलेला कचरा हात न लावता कसा उचलायचा .तसेच हात न लावता कचरापेटीत कसा टाकायचा त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी अमरावती शहरात तर करून दाखविले व त्यावर पेटंट मिळवले.
सरांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या वर्तनातून जाणवते. अनावश्यक खर्च टाळणे हा पिंड त्यांनी सुरुवात पासून जपला आहे आणि म्हणून स्वतःच्या लग्नात देखील त्यांनी आहे त्याच पोशाखावर स्वतःचे लग्न लावले. अमरावती शहरातील जुन्या पिढीतील सत्यशोधक श्री आनंदराव लढके व सौ नलिनीताई लढके यांच्या कन्या डॉक्टर इंदिरा लढके यांच्याशी ते विवाहबद्ध झालेत. अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी आपला विवाह समारोह घडवून आणला. यातून उरलेला पैसा ते समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचवतात .
गतवर्षी त्यांचे पद्मश्रीसाठी नामांकन झाले होते .अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय नामांकित संस्थांनी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले आहे. स्वतः लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी प्रत्यक्ष इंगोले सरांच्या घरी येऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे व त्यांच्या संशोधन कार्याची पाठराखण केली आहे. ते भारत सोडून परदेशात केव्हाही जाऊ शकले असते. तशा त्यांना ऑफरही आल्या होत्या .पण या माणसाचे भारतावर अमरावतीवर आपल्या जन्मभूमीवर नितांत प्रेम आहे आणि म्हणून त्यांनी नम्रपणे या सगळ्या ऑफर नाकारल्या .आज संशोधन क्षेत्रामध्ये त्यांचे आगळे नाव आहे .आपल्याबरोबरच त्यांनी कितीतरी संशोधक घडविले आहेत .म्हणूनच त्यांना संशोधकाचा संशोधक ही उपाधी देणे मला योग्य वाटते.
असा हा संशोधक वृत्तीचा माणूस. आपल्या 78 व्या वर्षीही त्यांनी आपला संशोधनाचा पिंड जोपासला आहे. अजूनही काही पेटंट त्यांना मिळू शकतात .त्यासाठी ते कार्यरत आहेत. अशा या जनसामान्यासाठी त्यांच्या विकासासाठी वेगवेगळ्या पेटंट बनवणाऱ्या व मानवी जीवन सुलभ करणाऱ्या संशोधनाला मूर्तीमंत रूप देणाऱ्या या माणसाला व त्यांनी केलेल्या संशोधनाला मानाचा मुजरा
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003