दिनांक 21 एप्रिल पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरी सेवा दिन सप्ताह साजरा करण्यात येतो. देशातील सगळे आयएएस आयपीएस आय आर एस अधिकारी या सप्ताहामध्ये गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात . याच दिवशी प्रशासनामध्ये गतिमानता आणणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील केला जातो. यावर्षी आमच्या अमरावती विभागातून तो सन्मान आयएएस अधिकारी व तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडे व अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांना प्राप्त झाला आहे.आपल्या महाराष्ट्रातील मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या काही आयएएस अधिकाऱ्यांचा हा परिचय
आपण मुख्य सचिव श्री विकास खारगे
एका महत्त्वाच्या कामासाठी मी श्री विकास खारगे माननीय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव यांना रात्री तीन वाजून 31 मिनिटांनी एस एम.एस केला. मला वाटले सकाळी साहेबांचा एसएमएस येईल .पण झाले उलटेच. फक्त दोन मिनिटात म्हणजे रात्री तीन वाजून 33 मिनिटांनी साहेबांनी माझे एसएमएसला उत्तर देऊन समाधान केले. इतक्या रात्री सतर्क राहणारा राहणारा हा अधिकारी आहे म्हणूनच मुख्यमंत्री बदलले पण श्री विकास खारगे मात्र त्याच पदावर कायम आहेत. कारण त्यांची तत्परता विनयशीलता आणि सातत्यता. अतिशय साधी राहणी खादीवर प्रेम अतिशय तत्पर सेवा आणि कुठलाही अहंकार नसलेला अधिकारी आज मंत्रालयामध्ये चर्चेत आहे तो त्यांच्या सुस्वाभावामुळे .असे चांगले अधिकारी जर मोठ्या प्रमाणात तयार झाले तर महाराष्ट्राचे हे चित्र अजून सुजलाम सफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या गावातून सर्वसामान्य कुटुंबातील आलेले आपल्या वडिलांपासून वाचण्याची प्रेरणा घेणारे आणि त्या बळावर आयएएस होणारे श्री विकास खारगे महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदावर कार्यरत राहून आता मंत्रालयात गेल्या कित्येक वर्षापासून मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रधान सचिव व आता अपर मुख्य सचिव म्हणून काम करीत आहेत .
अश्विनी भिडे
मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव श्री अश्विनी भिडे ह्या मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जातात. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून श्रीमती अश्विनी भिडे यांना पदस्थापना दिली. कला शाखेच्या पदवीधर असलेल्या अश्विनी भिडे यांनी मेट्रोमध्ये जे काम केलेले आहे त्यामुळे त्यांच्या मेट्रो वुमन म्हणून सर्वजण गौरव करतात. सांगलीसारख्या गावातून त्यांनी आपली पदवी प्राप्त केली. काही वर्ष प्राध्यापिका म्हणून पण काम केले आणि जेव्हा त्यांना आयएएस या परीक्षेची माहिती मिळाली तेव्हा आपण ही परीक्षा सहज पास होऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी आला आणि त्या आयएएस झाल्या. मुख्यमंत्री जेव्हा आपल्या कार्यालयात त्यांना प्रधान सचिव म्हणून निमंत्रित करतात त्यातच त्यांच्या कार्याचा गौरव आहे
डॉ. श्रीकर परदेशी
डॉ. श्रीकर परदेशी सध्या मुख्यमंत्री कार्यालयात माननीय मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. अतिशय विपरीत परिस्थिती मधून ते आय.ए.एस. झालेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून सर्वसामान्य माणसाविषयी तळमळ कळवळा दिसून येतो. आमच्या विदर्भात ते यवतमाळ व अकोला येथे सनदी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या उपक्रमावर स्वतंत्र पुस्तक लिहावे इतके त्यांचे विविध उपक्रम आहेत .सगळे उपक्रम हे लोकाभिमुख आहेत. पारदर्शक आहेत. आणि म्हणूनच श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिल्लीवरून प्रधानमंत्री कार्यालयातून आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात बोलावून घेतलेले आहे. श्री विकास खारगे श्रीमती अश्विनी भिडे व श्री श्रीकर परदेशी हे मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे तीनही अधिकारी मुख्यमंत्र्याची प्रशासकीय बाजू अतिशय समर्थपणे वेळेमध्ये पूर्ण करीत आहेत आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या कार्याला लोकाभिमुख करण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे
डॉ.हर्षदीप कांबळे
हर्षदीप कांबळे मंत्रालयामध्ये सामाजिक न्याय विभाग प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. हा माणूस समता पर्व रुजवणारा अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. आपल्या प्रशासकीय कार्याबरोबरच ते यवतमाळला असताना त्यांनी सक्मता पर्व सुरू केले. महात्मा फुले यांच्या जयंती पासून म्हणजे 11 एप्रिल पासून तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत असे समता पर्व त्यांनी यवतमाळला सुरू केले आणि आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये या समता पर्वाचे अनुकरण होत आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे प्रशासनामध्ये तत्परता ठेवणे यामुळे आज श्री हर्षदीप कांबळे हे मंत्रालयातील एक तत्पर तेजस्वी अधिकारी म्हणून ओळखले जातात
श्री तुकाराम मुंढे
महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत असणारे अधिकारी म्हणून श्री तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा गौरव करावा लागेल. यांच्या जेवढ्या बदल्या झाल्या तेवढ्या कोणत्याच अधिकाऱ्यांच्या झाल्या नाहीत. ते कुठेही गेले तरी इतके चांगले काम करतात की लगेच त्यांची बदली होते. त्यांच्या कामात पारदर्शकता आहे तत्परता आहे आणि भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी ते सतर्क आहेत. नियमानुसार काम हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे आणि म्हणूनच सर्वांनाच त्यांचे त्यांची खरी सत्याची नियमावली पटेलच असे नाही. ते ज्या विभागात जातात त्या विभागाला संपन्न करण्याचा तत्पर करण्याचा लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करतात. अतिशय कडक शिस्तप्रिय करारी अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे व तो योग्यही आहे
एकनाथ डवले
मंत्रालयातील कृषी विभाग पाटबंधारे विभाग आणि आता ग्रामविकास ही महत्त्वाची खाती सांभाळणारा एक महत्त्वपूर्ण अधिकारी म्हणून श्री एकनाथ डवले यांच्या नावलौकिक आहे. आयएएस अधिकारी बसने प्रवास करतो हे तुम्ही कधी ऐकले आहे का .पण हे खरे आहे. हा उच्चपदस्थ आयएएस अधिकारी जेव्हा आपल्या खाजगी कामासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावाला जातो तेव्हा शासकीय वाहन वापरत नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा वापर करतो. आपण स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालो याचे त्यांना भान आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या गावात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू केलेले आहे. त्यालाही आता 14 :: 15 वर्षाचा कालावधी उलटला आहे. ते लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे मी मात्र मागे वळूनी पाहतो मागे किती जण राहिले या कविश्रेष्ठ श्री सुरेश भटांच्या ओळीप्रमाणे ते काम करीत आहेत. आयएएस होण्यापूर्वी श्री एकनाथ ढवले हे चक्क शेती करत होते. . आयएएस होण्यासाठी गेल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या तज्ञ मंडळींनी त्यांना मी सध्या शेती करत आहे असे प्रश्नाचे उत्तर दिले आणि मुलाखत मंडळांनी विचार केला. हा माणूस आता शेती करतो आहे .हा जर प्रशासनात आला तर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकेल आणि त्यांनी या शेतकऱ्याच्या मुलाला शेतात राबणाऱ्या मुलाला आयएएस या भारतातल्या पहिल्या क्रमांकाच्या परीक्षेला पात्र ठरवले. विनम्रता व कार्य तत्परता त्यांच्या रक्तात भिनली आहे .
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003